IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सला आज नशिबाची फुल साथ मिळताना दिसतेय... पहिल्याच षटकात केएस भरत माघारी परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सामन्यावर पकड घेतील असे वाटले होते. पण, नशीब त्यांच्यावर रुसले... ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श LBW होता, पण मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले आणि RR लाही DRS घेण्याची बुद्धी सुचली नाही. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला एकाच षटकात तीन जीवदान मिळाले.
प्रत्युत्तरात दिल्लीलाही पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने धक्का दिला. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला के एस भरत ( KS Bharat) दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर वॉर्नर व मिचेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला. ही दोघं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत. मार्शने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावताना ४८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी केली आहे. तर वॉर्नरही २७ धावांवर खेळतोय. ही जोडी तोडण्यासाठी कर्णधार संजू सॅमसनने फिरकीपटू युजवेंद्र चहलला गोलंदाजीला आणले.
९व्या षटकातील दुसरा चेंडू वॉर्नरने शॉर्ट बॉस भिरकावला, परंतु सीमारेषेवर देवदत्त पडिक्कल तो जज करण्यात चुकला अन् षटकार मिळाला. पुढच्याच चेंडूवर वॉर्नरने उत्तुंग फटका मारला. यावेळेत जोस बटलरने सर्वस्व पणाला लावले, परंतु त्याच्या हातूनही झेल सुटला. हे कमी होतं की काय ६वा चेंडू यष्टींना घासून गेला अन् लाल लाईटही पेटली. पण, बेल्स न पडल्याने वॉर्नर नाबाद राहिला.