Join us  

IPL 2022, RR Vs KKR: केकेआरच्या पराभवाला केवळ एक खेळाडू जबाबदार, निसटत्या पराभवानंतर श्रेयस अय्यरनं सांगितलं नाव

IPL 2022, RR Vs KKR, Shreyas Iyer: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सला ७ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ एका खेळाडूला पराभवासाठी जबाबदार ठरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 8:51 AM

Open in App

मुंबई - आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सला ७ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. राजस्थानने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा कोलकाता नाईटरायडर्सने जोरदार पाठलाग सुरू केला होता. आरोन फिंच आणि कर्णधान श्रेयस अय्यर यांच्या तुफानी खेळींच्या जोरावर केकेआरचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र निर्णायक क्षणी डाव कोसळल्याने केकेआरचा संघ २१० धावांवर गारद झाला. दरम्यान, सामन्यानंतर कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ एका खेळाडूला पराभवासाठी जबाबदार ठरवले आहे.

श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की, युझवेंद्र चहलने सामन्याचे पारडे फिरवले. फिंचच्या फटकेबाजीमुळे सुरुवातीपासूनच आम्ही चांगल्या धावगतीसह धावा जमवत होतो. मात्र आम्ही ही लय कायम ठेवू शकलो नाही. मात्र हा खेळाचाच एक भाग आहे. मी अखेरपर्यंत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र चहलने सारे चित्रच बदलून टाकले.

श्रेयस अय्यरने सांगितले की, आमच्या संघाने मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. मात्र आम्ही ही लय कायम कायम राखू शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर ढेपाळला. अखेर कोलकात्याचा डाव १९.४ षटकांत २१० धावांवर गारद झाला. या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या युझवेंद्र चहलने ४ षटकांत ४० धावा देऊन ५ विकेट्स टिपल्या.

श्रेयस अय्यरने सांगितले की, जोस बटलरने संथ सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याने वेगाने धावा जमवत सुरेख खेळी केली. परिस्थिती पाहिली तर आज मैदानात दव पडला नव्हता, खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती. हे मैदान आमच्यासाठी फार चांगले राहिलेले नाही. मात्र सकारात्मक पुनरागमन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.  

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यर
Open in App