IPL 2022 RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याने कल्पकतेने फॉर्मात असलेल्या युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) गोलंदाजीचा वापर करून घेतला. आर अश्विनने सहाव्या षटकात पंजाब किंग्सला ( PBKS) पहिला धक्का देताना शिखर धवनला ( १२) माघारी पाठवले. पण, जॉनी बेअरस्टो व भानुका राजपक्षा ही जोडी राजस्थानसाठी डोकेदुखी ठरत होती. ११व्या षटकात युजवेंद्र चहलला गोलंदाजीला आणले आणि त्यानंतर पंजाबचे तीन फलंदाज पटापट माघारी परतले. चहलने आजच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आणि २००८मध्ये पाकिस्तानी गोलदाज सोहैल तन्वीर याने केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. लसिथ मलिंगाचा विक्रमालाही चहलने आव्हान दिले आहे.
११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भानुकाने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, पंरतु चहलने टाकलेल्या गुगलीसमोर तो अपयशी ठरला अन् चेंडूने त्याची दांडी गुल केली. भानुका २७ धावांवर बाद झाला. कर्णधार मयांक अग्रवालने काही सुरेख फटके मारले, परंतु चहलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. जोस बटलरने सीमारेषेवर मयांकचा ( १२) झेल टिपला. १४व्या षटकाच्याच चौथ्या चेंडूवर चहलने मोठी विकेट घेतली. ४० चेंडूंत ८ चौकार १ षटकार खेचून ५६ धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला त्याने LBW केले. बेरअस्टोने DRS घेतला, परंतु अम्पायर्स कॉलमुळे त्याला माघारी जावे लागले. चहलने ४ षटकांत २८ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. ( पाहा IPL 2022 - RR vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)
राजस्थान रॉयल्सकडून एकाच पर्वात सर्वाधिक विकेट घेणारे फिरकीपटू २२* - युझवेंद्र चहल ( २०२२) २० - श्रेयस गोपाळ ( २०१९) १९ - शेन वॉर्न ( २००८)१५ - प्रविण तांबे ( २०१४) १४ - शेन वॉर्न ( २००९)
राजस्थानसाठी एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज२८ - जेम्स फॉल्करन ( २०१३)२२ - सोहैल तन्वीर ( २००८)२२*- युझवेंद्र चहल ( २०२२)२० - श्रेयस गोपाळ ( २०१९) २० - जोफ्रा आर्चर ( २०२०)
ट्वेंटी-२०त युजवेंद्र चहलने कोणाला सर्वाधिकवेला बाद केलेक्विंटन डी कॉक व मयांक अग्रवाल ( प्रत्येकी ६ वेळा), ग्लेन मॅक्सवेल, किरॉन पोलार्ड, संजू सॅमसन व नितिश राणा ( प्रत्येकी ५ वेळा)
आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक वेळा २० विकेट्स घेणारे गोलंदाज ४ - युजवेंद्र चहल ( २०१५, २०१६, २०२०, २०२२) ३ - लसिथ मलिंगा ( २०११, २०१२, २०१५) ३ - सुनिल नरीन ( २०१२, २०१३, २०१४)