Join us  

Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : ओपनिंगला येऊनही तोच किस्सा झाला; विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, Riyan Paragने मस्त कॅच घेतला, Video

रुसलेल्या नशिबाला सडेतोड उत्तर देण्यासाठी विराट कोहली ( Virat Kohli) याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज ओपनिंगला येण्याचा निर्णय केला. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 9:57 PM

Open in App

IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : रुसलेल्या नशिबाला सडेतोड उत्तर देण्यासाठी विराट कोहली ( Virat Kohli) याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज ओपनिंगला येण्याचा निर्णय केला. पण, ज्याच्या नावातच प्रसिद्ध 'कृष्णा' आहे त्याने विराटला आजही अपयशी ठरवले.  आजचा सामना जेवढा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ( RCB) महत्त्वाचा आहे, तितकाच विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) मागील दोन सामन्यांत विराट गोल्डन डकवर बाद झाला आहे. त्याने ८ सामन्यांत १७च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ( RR) सलामीला येण्याचा निर्णय घेतला, पण नशीब रुसलेच आहे. 

मोहम्मद सिराज ( २-३०), जॉश हेजलवूड ( २-१९) व वनिंदू हसरंगा ( २-२३) यांनी राजस्थान रॉयल्सला सुरुवातीला धक्के दिले. पण, रियान परागने ( Riyan Parag) संयमी खेळी करताना अर्धशतकासह RRला समाधानकारक पल्ला गाठून दिला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला जोस बटलर ( ७) आज अपयशी ठरला. देवदत्त पडिक्कलने (८) अपयशाचा पाढा कायम राखला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आर अश्विनने ( १७) चार चौकार खेचून चांगले संकेत दिले, परंतु मोहम्मद सिराजने त्याला माघारी पाठवला. 

कर्णधार संजू सॅमसनकडून ( २७) अपेक्षा होत्या, परंतु वनिंदूने चतुराईने त्याला बाद केले. वनिंदूच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा संजूचा प्रयत्न फसला आणि वेगाने टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडवला.  मिचेल ( १६) व रियान पराग यांनी ३१ धावांची भागीदारी केली. शिमरोन हेटमायर ( ३) पुन्हा फेल गेला. रियान परागने एकाकी झूंज देताना २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परागने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १४४ धावा केल्या. त्याने हर्षल पटेलने टाकलेल्या २०व्या षटकात १८ धावा चोपल्या.  

 

विराटला अजही अपयश आले. दुसऱ्या षटकाच्या चौथा चेंडू प्रसिद्ध कृष्णाने बाऊन्सर टाकला. त्यावर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न विराटचा फसला अन् चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने असलेल्या रियानच्या दिशेने गेले. रियाननेही सुरेख झेप घेत कॅच घेतली. राजस्थानच्या खेळाडूंनी जल्लोषाला सुरुवात केली, परंतु मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय दिला. त्यावर RRने DRS घेतला आणि त्यात विराट बाद असल्याचे समोर आले. विराटही स्वतःच्या नशिबावर हसत मैदानाबाहेर गेला. पहिल्या षटकात विराटला जीवदान मिळाले होते. विराट ९ धावांवर माघारी परतला. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App