IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सची आघाडीची फळी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर कोलमडून पडली. फॉर्मात असलेला जोस बटलर ( Jos Buttler) याची जॉश हेझलवूडने विकेट घेत RRला मोठा धक्का दिला. देवदत्त पडिक्कल व तिसऱ्या क्रमांकावर आलेला आऱ अश्विन यांना मोहम्मद सिराजने बाद केले. कर्णधार संजू सॅमसनकडून ( Sanju Samson) आज बऱ्याच अपेक्षा होत्या, त्याने सुरुवातही दणक्यात केली. पण, अती आत्मविश्वास त्याला नडला आणि वनिंदू हसरंगाने ( Wanindu Hasaranga) त्याचा त्रिफळा कुठच्या कुठे उडवला.
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आजचा सामना जेवढा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ( RCB) महत्त्वाचा आहे, तितकाच विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) मागील दोन सामन्यांत विराट गोल्डन डकवर बाद झाला आहे. त्याने ८ सामन्यांत १७च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ( RR) सलामीला येण्याचा निर्णय घेतला आहे. RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने त्यांना यश मिळवून दिले. RRचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल ( ७) LBW झाला. राजस्थानने तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विनला ( R Ashwin) फलंदाजीला पाठवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अश्विननेही पहिल्या दोन चेंडूंवर चौकार खेचून RCBला थक्क केले.
त्यानंतरच्या सिराजच्या षटकातही अश्विनने सलग दोन चौकार खेचले, परंतु RCBच्या गोलंदाजाने संथ बाऊन्सर टाकून अश्विनला ( १७) माघारी पाठवले. पुढील षटकात जॉश हेझलवूडने RRला मोठा धक्का देताना बटलर ( ८) याची विकेट घेतली. संजू व डॅरील मिचेल यांनी RRचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संजूने तीन खणखणीत षटकार खेचून RCBच्या ताफ्यात तणाव निर्माण केले होते, परंतु वनिंदूने चतुराईने त्याला बाद केले. वनिंदूच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा संजूचा प्रयत्न फसला आणि वेगाने टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडवला. संजू २७ धावांवर बाद झाला.
पाहा व्हिडीओ...