CSK in Big Trouble, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी जवळपास सर्वच संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर आदी खेळाडू दुखापतीतून सावरण्यासाठी BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) ला प्रमुख खेळाडू ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि दीपक चहर यांच्या फिटनेसची चिंता लागलेली आहे. त्यामुळे पुढील ४८ तास हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशात ऋतुराजच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेआधी ऋतुराजच्या मनगटाला दुखापत झाली, दीपकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दुखापत झाली. पण, यांच्या तंदुरुस्तीबाबत CSKकडे अपडेट्स नाहीत. CSKचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितले होते की, त्यांच्या सध्याच्या तंदुरूस्तीबाबत आमच्याकडेच अपडेट्स नाहीत. त्यामुळे ते कधी संघासोबत दिसतील हे मी सांगू शकत नाही.
पण, चेन्नई सुपर किंग्सची चिंता किंचितशी मिटली आहे. ऋतुराज पूर्णपणे तंदुरुस्त होऊन CSKच्या सुरत येथील कॅम्पच्या दिशेने रवाना झाला आहे आणि त्याने इंस्टाग्रावर स्वतः ही माहिती दिली आहे.
दीपक चहरच्या तंदुरुस्तीच्या रिपोर्ट अद्याप हाती लागलेला नाही. CSKने १४ कोटी रुपये मोजून चहरला आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले. त्यामुळे हा खेळाडू संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे वेगळे सांगायला नको.
- चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).