IPL 2022: प्रेक्षकसंख्या रोडावली, रेटिंग घटले, चिंता वाढली, बीसीसीआयने शोधावेत नवे

IPL 2022: आयपीएलच्या टीव्ही प्रेक्षकसंख्या आणि रेटिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून यात सातत्याने घट नाेंदविण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:55 AM2022-04-10T11:55:31+5:302022-04-10T11:55:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Spectator Ratings Decline, Concerns Rise, BCCI Seeks New | IPL 2022: प्रेक्षकसंख्या रोडावली, रेटिंग घटले, चिंता वाढली, बीसीसीआयने शोधावेत नवे

IPL 2022: प्रेक्षकसंख्या रोडावली, रेटिंग घटले, चिंता वाढली, बीसीसीआयने शोधावेत नवे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर )

आयपीएलच्या टीव्ही प्रेक्षकसंख्या आणि रेटिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून यात सातत्याने घट नाेंदविण्यात येत आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या आकडेवारीनुसार  प्रारंभीच्या ८ सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग २.५२ एवढे हाेते. त्या तुलनेत २०२१ मध्ये चांगले रेटिंग मिळाले हाेते.

घरच्या मैदानावरही गर्दी नाहीच
टीव्ही रेटिंगशिवाय व्ह्यूअरशिपमध्येही १४ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. त्या तुलनेत २०२१ आणि २०१९ या दाेन हंगामामध्ये अनुक्रमे ४ आणि ७ सामन्यांना एवढी प्रेक्षकसंख्या मिळाली हाेती. क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीगचे हे आकडे क्रिकेटधुरिणांची झोप उडविणारे असावेत. गेली दोन वर्षे इतर खेळासारखाच आयपीएललादेखीेल कोविडचा फटका बसला. पण एकही पर्व चुकले नाही. 

२०२० ला संपूर्ण सामने यूएईत झाले, शिवाय २०२१ चे अर्धे पर्वदेखील यूएईतच पार पडले. यूएईतील सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रवेशही नव्हता. यंदा घरच्या मैदानावर सामने होत असल्याने प्रेक्षकसंख्या वाढण्याची अपेक्षा होती.  मात्र, आकडेवारी वेगळे चित्र दर्शविते. विविध शहरांऐवजी मुंबई, पुण्यापर्यंतच आयोजन मर्यादित ठेवल्याचा हा फटका मानावा का?

मनोरंजनाचे अनेक पर्याय
यंदा नव्या दोन संघांची भर पडल्याने बीसीसीआयला १२००० कोटींहून अधिक रक्कम प्राप्त झाली. माध्यम राईट्स ५० हजार कोटींहून अधिक रकमेत विकले जातील. पण प्रायोजकत्व मात्र किती लोक सामने पाहतील यावर अवलंबून असते. आयपीएलच्या लोकप्रियतेत प्रेक्षकसंख्या अखेर महत्त्वपूर्ण ठरली आहे. प्रेक्षकसंख्या का कमी झाली हेदेखील कोडे आहे. नवे संघ जोडले गेले, तार्किकरीत्या प्रेक्षकांची आवड वाढली, आतापर्यंतचे सामने उत्कंठापूर्ण झाले तरीही प्रेक्षकसंख्या रोडावली, याला काय म्हणावे? यंदा सामन्यांची संख्या वाढल्यामुळे असे घडणे स्वाभाविक आहे. कदाचित पुढे प्रेक्षक जोडले जातील.  टीव्हीसह माध्यमांमध्ये ग्राहकांना मनोरंजनाचे अन्य पर्यायदेखील उपलब्ध आहेत. आयपीएलसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी का? 

‘डबल हेडर’मुळे प्रेक्षक दुरावले?
एकाच दिवशी दोन सामने (डबल हेडर) ठेवल्यामुळे हे घडले का? दुपारी ३.३० वाजेच्या सामन्याला सायंकाळच्या सामन्याइतके प्रेक्षक हजेरी लावत नसावेत. प्रेक्षक संख्येत काही प्रमाणात घट होणे स्वाभाविक आहे. जगातील काही प्रमुख स्पर्धांमध्ये असे झालेदेखील. २००८ पासून सुरू झालेले आयपीएल याला अपवाद म्हणावे लागतील. दरवर्षी लोकप्रियतेच्या कक्षा वृंदावत गेल्या, असा तर्क बीसीसीआय देऊ शकेल; पण यामुळे अधिकाऱ्यांनी संतुष्ट राहू नये. अलीकडे प्रेक्षकसंख्येबाबतच्या विरोधाभासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही गोष्टी सुधारण्यास वाव आहे. कारणांचा शोध घेत पुढील नियोजन करणे हाच यावर उपाय असेल. 

Web Title: IPL 2022: Spectator Ratings Decline, Concerns Rise, BCCI Seeks New

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.