IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : उम्रान मलिकने ( Umram Malik) गुजरात टायटन्सची वाट लावली. जम्मू काश्मीरचा हा गोलंदाज सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात टी नटराजनचा रिप्लेसमेंट म्हणून दाखल झाला होता आणि आज तो संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. त्याच्या वेगासमोर गुजरातच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पाच विकेट्स घेत त्याने SRHला विजयी मार्गावर आणले.
हैदराबादच्या १९५ धावांचा पाठलाग करताना
गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल व वृद्धीमान सहा या जोडीने दमदार सुरूवात केली. त्यांनी ९च्या सरासरीने फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. पण, वेगाचा बादशाह ठरणाऱ्या उम्रान मलिकने ( Umram Malik) सामना फिरवला. १४४.२kmph च्या वेगाने चेंडू टाकून त्याने गिलचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर आलेल्या
हार्दिक पांड्याला जखमी केले. पुढील षटकात हार्दिकची विकेट घेत उम्रानने हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. हार्दिकची विकेट पाहून पत्नी नताशा स्टँकोव्हिचचा ( Natasa Stankovic) चेहरा पडला. गिल २२ आणि हार्दिक १० धावांवर बाद झाले.
वृद्धीमान सहा व डेव्हिड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना २४ चेंडूंत ३७ धावा जोडल्या. सहाने अर्धशतक पूर्ण करताना चांगले फटके मारले. पण, उम्रानच्या वेगाने येणाऱ्या यॉर्करचा अंदाज बांधण्यात तो चुकला अन् 152 kmph च्या वेगाने आलेल्या चेंडूवर सहाचा त्रिफळा उडाला. सहाने ३८ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ६८ धावा केल्या. त्यानंतर त्याने एकाच षटकात डेव्हिड मिलर ( १७) व अभिनव मनोहर (०) यांचा त्रिफळा उडवून आयपीएलमध्ये प्रथमच पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ..
Web Title: IPL 2022 SRH vs GT Live Updates : Maiden five-wicket haul for Umran Mali, he with a peach of 152.8kmph to clean up Wriddhiman Saha, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.