Join us  

Rashid Khan,Rahul Tewatia, IPL 2022 SRH vs GT Live Updates : राहुल तेवातिया व राशिद खानची मॅच विनिंग खेळी, २४ चेंडूंत ५९ धावा चोपून मिळवला रोमहर्षक विजय

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातला आजचा सामना कमालीचा चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:30 PM

Open in App

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातला आजचा सामना कमालीचा चुरशीचा झाला. फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर SRHच्या उम्रान मलिकने ( Umran Malik) त्याच्या वेगाने कहर केला. उम्रानने GTच्या शुबमन गिल, हार्दिक पांड्या, वृद्धीमान सहा, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर या मॅच विनिंग फलंदाजांना बाद केले. त्यामुळे हा सामना हैदराबाद जिंकेल असेच चित्र  बनले होते ,परंतु राहुल तेवातिया पुन्हा एकदा संकटमोचक ठरला. राहुल व राशिद खान यांनी अखेरच्या षटकात २५ धावा चोपून काढताना गुजरातला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. १६ षटकांत गुजरातच्या ४ बाद १४० धावा होत्या आणि तेथून त्यांनी ५९ धावा चोपल्या. 

 हैदराबादच्या १९५ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल व वृद्धीमान सहा या जोडीने दमदार सुरूवात केली. त्यांनी ९च्या सरासरीने फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. पण, वेगाचा बादशाह ठरणाऱ्या उम्रान मलिकने ( Umram Malik) सामना फिरवला. १४४.२kmph च्या वेगाने चेंडू टाकून त्याने गिलचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला जखमी केले. पुढील षटकात हार्दिकची विकेट घेत उम्रानने हैदराबादला मोठे यश मिळवून दिले 

वृद्धीमान सहा व डेव्हिड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना २४ चेंडूंत ३७ धावा जोडल्या. सहाने अर्धशतक पूर्ण करताना चांगले फटके मारले. पण, उम्रानच्या वेगाने येणाऱ्या यॉर्करचा अंदाज बांधण्यात तो चुकला अन् 152 kmph च्या वेगाने आलेल्या चेंडूवर सहाचा त्रिफळा उडाला. सहाने ३८ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ६८ धावा केल्या. त्यानंतर त्याने एकाच षटकात डेव्हिड मिलर (  १७) व अभिनव मनोहर (०) यांचा त्रिफळा उडवून आयपीएलमध्ये प्रथमच पाच विकेट्स  घेण्याचा पराक्रम केला. त्याने २५ धावांत ५ विकेट्स  घेतल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावा हव्या असताना राहुल तेवातिया व ऱाशिद खान यांनी मिळून ४ षटकारासह २५ धावा कुटल्या. गुजरातने ५ विकेट्सने हा सामना जिंकला. तेवातिया २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर, तर राशिद खान ११ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर नाबाद राहिले.   

केन विलियम्सन ( ५) व राहुल त्रिपाठी ( १६) माघारी परतल्यानंतर अभिषेक शर्मा व एडन मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून हैदराबादच्या डावाला आकार दिला. अभिषेक ४२ चेंडूंत ६ चौकार  व ३ षटकारांसह ६५ धावांवर त्रिफळाचीत झाला.  मार्कराम ५६ धावांवर ( २ चौकार व ३ षटकार) बाद झाला. मार्को येनसेन व शशांक सिंग यांनी अखेरच्या षटकात चार षटकार खेचून २५ धावा कुटल्या आणि हैदराबादने ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. शशांक ६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला ( ३ षटकार  व १ चौकार). मोहम्मद शमीने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App