IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : हैदराबादच्या १९५ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल व वृद्धीमान सहा या जोडीने दमदार सुरूवात केली. त्यांनी ९च्या सरासरीने फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. पण, वेगाचा बादशाह ठरणाऱ्या उम्रान मलिकने ( Umram Malik) सामना फिरवला. १४४.२kmph च्या वेगाने चेंडू टाकून त्याने गिलचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला जखमी केले. पुढील षटकात हार्दिकची विकेट घेत उम्रानने हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. हार्दिकची विकेट पाहून पत्नी नताशा स्टँकोव्हिचचा ( Natasa Stankovic) चेहरा पडला. गिल २२ आणि हार्दिक १० धावांवर बाद झाले.
पाहा व्हिडीओ...
सनरायर्झस हैदराबादने संथ सुरूवातीनंतरही गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. अभिषेक शर्मा व एडन मार्कराम यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीसोबत ९१ धावांच्या भागीदारीने SRHचा डाव सावरला. त्यात आज मैदानावर उतरलेल्या शशांक सिंगने ( Shashank Singh) अखेरच्या षटकात वादळी खेळी केली. ६ चेंडूंचा सामना करताना त्याने ४, २, १, ६, ६, ६ अशी फटकेबाजी करताना २५ धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला.
केन विलियम्सन ( ५) व राहुल त्रिपाठी ( १६) माघारी परतल्यानंतर अभिषेक शर्मा व एडन मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून हैदराबादच्या डावाला आकार दिला. अभिषेक ४२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर त्रिफळाचीत झाला. मार्कराम ५६ धावांवर ( २ चौकार व ३ षटकार) बाद झाला. मार्को येनसेन व शशांक सिंग यांनी अखेरच्या षटकात चार षटकार खेचून २५ धावा कुटल्या आणि हैदराबादने ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. शशांक ६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला ( ३ षटकार व १ चौकार). मोहम्मद शमीने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ..