IPL 2022 Playoffs Scenarios: मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला रोमहर्षक झाला. १८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना मुंबई सहज जिंकेल असेच चित्र होते. १८ चेंडूंत विजयासाठी ४५ धावा हव्या असताना टीम डेव्हिडने ( Tim David) टी नटराजनच्या पाच चेंडूंत ४ षटकार खेचून २६ धावा कुटल्या. पण, अखेरच्या चेंडूवर एक धाव घेऊन पुढील षटकात स्ट्राईक मिळवण्याच्या प्रयत्नात टीम डेव्हिड बाद झाला आणि मुंबई इंडियन्सचे चाहते गपगार झाले. त्यात सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ( Sara Tendulkar) ही पण होती. डेव्हिड रन आऊट झाल्यानंतर साराची रिअॅक्शन व्हायरल झाली.
सनरायझर्स हैदराबादने पुन्हा गणित बिघडवलं; दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, पंजाब यांना 'गॅस'वर बसवलं!
१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी धडाकेबाज सुरूवात करून दिली. पण, उम्रान मलिकने ( Umran Malik) त्यांची दाणादाण उडवली. भुवनेश्वर कुमारने १९वे षटक निर्धाव फेकून मॅच फिरवली. प्रियाम गर्ग ( ४२), राहुल त्रिपाठी ( ७६) आणि निकोलस पूरन (३८) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. डॅनिएल सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीप सिंगने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या. १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ४८) व इशान किशन ( ४३) यांनी ९५ धावांची भागीदारी केली. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मुंबईवर थोडे दडपण आले. टी नटराजनने आज दिशाहीन गोलंदाजी केली आणि टीम डेव्हिडने त्याचा फायदा उचलला. १८व्या षटकात त्याने चार षटकार खेचून २६ धावा कुटल्या. अखेरच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात नटराजनने त्याला रन आऊट केले. डेव्हिड १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. मुंबईला १२ चेंडूंत १९ धावा करायच्या होत्या. भुवीने १९वे षटक निर्धाव फेकले आणि मुंबईला ६ चेंडूंत १९ धावांचे आव्हान ठेवले. फझलहक फारूकीने १५ धावा दिल्या. मुंबईला ७ बाद १९० धावा करता आल्याने हैदराबादने ३ धावांनी बाजी मारली.
पाहा टीम डेव्हिडची अफलातून फटकेबाजी