Join us  

Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : 6,6,6,6,6,4,4!; लिएम लिव्हिंगस्टोनची आतषबाजी, २२ चेंडूंत मॅच विनिंग खेळी, Video

आयपीएल २०२२चा त्यांनी १४ गुणांसह सहाव्या क्रमांकावरून निरोप घेतला. SRHचे १५८ धावांचे लक्ष्य PBKS ने १५.१ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 11:21 PM

Open in App

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : पंजाब किंग्सनेआयपीएल २०२२मधील अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. आयपीएल २०२२चा त्यांनी १४ गुणांसह सहाव्या क्रमांकावरून निरोप घेतला. SRHचे १५८ धावांचे लक्ष्य PBKS ने १५.१ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. लिएम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone) पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या वादळी खेळीने हैदराबादच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. लिव्हिंगस्टोनला ६ व २६ धावांवर वॉशिंग्टन सुंदरने जीवदान दिले आणि तेच हैदराबादला महागात पडले.   अभिषेक शर्मा ( ४३), राहुल त्रिपाठी ( २०), एडन मार्कराम ( २१), वॉशिंग्टन सुंदर ( २५) व रोमारिओ शेफर्ड ( २६*) यांच्या योगदानामुळे हैदराबादने ८ बाद १५७ धावा केल्या. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. नॅथन एलिसने ( Nathan Ellis) ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून शिखर धवन ( ३९), जॉनी बेरअस्टो ( २३) व शाहरुख खान ( १९) या आघाडीच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला.  लिएम लिव्हिंगस्टोन मात्र नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळला, त्याने २२ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४९ धावा केल्या. प्रेरक मंकडने चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला. पंजाबने ५ विकेट्स व २९ चेंडू राखून १६० धावा केल्या. हैदराबादकडून फजलहक फारूकीने २ विकेट्स घेतल्या.

लिएम लिव्हिंगस्टोनने आयपीएल २०२२त १४ सामन्यांत १८२.०८च्या स्ट्राईक रेटने ४३७ धावा केल्या. त्यात ४ अर्धशतकांचा, २९ चौकारांचा व ३४ षटकारांचा समावेश आहे. शिवाय त्याने ६ विकेट्सही घेतल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App