Join us  

Mayank Agarwal IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : OMG; उम्रान मलिकचा वेगवान चेंडू मयांक अग्रवालच्या बरगडीवर आदळला, PBKSचा कर्णधार आडवा झाला 

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : सनरायझर्स हैदराबादच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 10:19 PM

Open in App

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : सनरायझर्स हैदराबादच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो व शाहरुख खान हे दोघंही आक्रमक खेळी करून माघारी परतले. आता PBKSचा कर्णधार मयांक अग्रवाल व शिखर धवन मैदानावर आहे. ७व्या षटकात उम्रान मलिकच्या गोलंदाजीवर मयांक ( Mayank Agarwal) जखमी झाला. उम्रानने टाकलेला वेगवान चेंडू त्याच्या बरगडीवर जोरात आदळला आणि PBKSचा कर्णधार जमिनीवर आडवा झाला. बराच काळ तो मैदानावर पडून होता आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार केले गेले. पेन किलर खाऊन तो खेळला, मात्र ८व्या षटकात तो झेलबाद झाला. ( पाहा IPL 2022 - SRH vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तिसऱ्याच षटकात त्यांच्या अंगलट आला. पंजाब किंग्सच्या कागिसो रबाडाने SRHला धक्का दिला. पण, राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. यांची ४७ धावांची भागीदारी हरप्रीत ब्रारने ( Harpreet Brar ) संपुष्टात आणली. त्रिपाठी २० धावांवर परतला. अभिषेक ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला.

लिएम लिव्हिंगस्टोनने अफलातून झेल घेतला. हरप्रीतने ( ३-२६)  तीन मोठे धक्के दिले. पण, वॉशिंग्टन सुंदर ( २५) व रोमारीओ शेफर्ड ( २६*) यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली व हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.  या दोघांनी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. हैदराबादने ८ बाद १५७ धावा केल्या. नॅथन एलिसने ( Nathan Ellis) ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

लिएम लिव्हिंगस्टोनने कसला अफलातून कॅच घेतला, प्रीती झिंटाला आनंद झाला, Video

प्रत्युत्तरात, जॉनी बेरअस्टोने आक्रमक सुरुवात केली, भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात त्याने तीन सुरेख चौकार खेचले. त्यात त्याला दुसऱ्या षटकात उम्रान मलिकने झेल सोडून जीवदान दिले. पण, त्याचा फार फायदा झाला नाही, तिसऱ्याच षटकात फझलहक फारूकीने (  Fazalhaq Farooqi ) बेअरस्टोचा ( २३) त्रिफळा उडवला.  शाहरूख खानने आक्रमक सुरुवात करताना मस्त फटके मारले. सहाव्या षटकात शिखर धवनने दोन उत्तुंग षटकार खेचले आणि पंजाबने पॉवर प्ले मध्ये १ बाद ६० धावा केल्या. ७व्या षटकात उम्रान मलिकला गोलंदाजीला आणले आणि त्याने शाहरुखला ( १९) वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद केले. 

टॅग्स :आयपीएल २०२२मयांक अग्रवालपंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App