Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : लिएम लिव्हिंगस्टोनने कसला अफलातून कॅच घेतला, प्रीती झिंटाला आनंद झाला, Video

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तिसऱ्याच षटकात त्यांच्या अंगलट आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 08:32 PM2022-05-22T20:32:20+5:302022-05-22T20:32:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : What a catch by Liam Livingstone, Abhishek Sharma goes for 43; Harpreet Brar gets two wickets, Video  | Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : लिएम लिव्हिंगस्टोनने कसला अफलातून कॅच घेतला, प्रीती झिंटाला आनंद झाला, Video

Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : लिएम लिव्हिंगस्टोनने कसला अफलातून कॅच घेतला, प्रीती झिंटाला आनंद झाला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तिसऱ्याच षटकात त्यांच्या अंगलट आला. पंजाब किंग्सच्या कागिसो रबाडाने SRHला धक्का दिला. पण, राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. मात्र, हरप्रीत ब्रारने ( Harpreet Brar ) या दोन्ही सेट फलंदाजांना माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingstone) सीमारेषेवर अफलातून झेल घेत अभिषेकला माघारी पाठवले. त्याचा हा झेल पाहून PBKSची सह मालकिण प्रीती झिंटा आनंदी झाली. 


भुनवेश्वर कुमार आज #SRH चे नेतृत्व करतोय.. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचा निर्धार भुवीने बोलून दाखवला आहे. हैदराबादच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. केन विलियम्सन व टी नटराजन यांच्याजागी रोमारिओ शेफर्ड व जगदीशा सुचिथ यांची निवड झाली आहे. पंजाबच्या संघातही भानुका राजपक्षा, राहुल चहर व रिषी धवन यांच्याजागी नॅथन एलिस, शाहरुख खान व प्रेरक मंकड यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कागिसो रबाडाने तिसऱ्या षटकात हैदराबादला पहिला धक्का दिला. प्रियाम गर्ग ( ४) मयांक अग्रवालच्या हाती झेलबाद झाला. अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी यांनी SRHचा डाव सावरला. ६व्या षटकात नॅथन एलिसच्या पहिल्याच चेंडूवर त्रिपाठीने सरळ फटका मारला, एलिसने तो टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा वेग खूप होता. चौथा चेंडू त्रिपाठीने सीमापार पाठवला आणि आयपीएल २०२२मध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला. अभिषेकनेही  ४००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि ही दोघं SRHकडून यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. राहुल त्रिपाठी व अभिषेक शर्मा यांची ४७ धावांची भागीदारी हरप्रीत ब्रारने संपुष्टात आणली. त्रिपाठी २० धावांवर शिखर धवनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.  

त्रिपाठीने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत ३७.५४च्या सरासरीने ४१३ धावा केल्या आणि त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हरप्रीतने पुढील षटकात SRHला आणखी एक धक्का दिला. अभिषेकने मारलेला उत्तुंग फटका लिएम लिव्हिंगस्टोनने सीमारेषेवर अप्रतिमरित्या टिपला. अभिषेक ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. आयपीएल २०२२मध्ये त्याने SRHकडून सर्वाधिक ४२६ धावा केल्या आहेत.   ( पाहा IPL 2022 - SRH vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )


Web Title: IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : What a catch by Liam Livingstone, Abhishek Sharma goes for 43; Harpreet Brar gets two wickets, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.