महान फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार सचिन निवृत्तीनंतर फ्रँचायझी लीगमधील सर्वात यशस्वी संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. त्यामुळे तो संघासोबतच असतो. सचिनने मुंबई इंडियन्सकडून ७८ सामन्यांत १ शतक व १३ अर्धशतकांसह ३४,८४च्या सरासरीने २३३४ धावा केल्या आहेत. त्याच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच जेतेपदं पटकावली आहेत.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढती गमावल्या आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने १७८ धावांचे लक्ष्य ४ विकेट्स राखून पार करून मुंबई इंडियन्सला धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला ८ बाद १७० धावाच करता आल्या. मुंबईचा आता पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आहे. त्यासाठी मुंबईची टीम तेथे दाखल झाली आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई-पुणे प्रवासादरम्यानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पुण्यात जाताना वाहतुक कोंडीचा सचिनलाही सामना करावा लागला आणि त्यावेळेत त्याने मराठी गाणी ऐकली. मी डोलकर मी डोलकर हे गाणं ऐकतानाचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.
Web Title: IPL 2022 : Stuck in traffic while heading to Pune; Mumbai Indians Mentor Sachin Tendulkar Sing Marathi Song Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.