Sunil Gavaskar Kohinoor, IPL 2022 : तुमच्या सरकारला सांगा आमचा कोहिनूर परत द्यायला!; सुनील गावस्कर On Air ब्रिटीश कमेंटेटरला म्हणाले, बघा पुढे काय झाले, Video

Sunil Gavaskar Kohinoor, IPL 2022 : भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आयपीएल सामन्यादरम्यान समालोचन करताना केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:14 PM2022-04-12T16:14:19+5:302022-04-12T16:14:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 : Sunil Gavaskar ribbing Alan Wilkins about the British taking away the Kohinoor after Wilkins made a comment about Marine Drive being called the Queen’s Necklace is GOLD | Sunil Gavaskar Kohinoor, IPL 2022 : तुमच्या सरकारला सांगा आमचा कोहिनूर परत द्यायला!; सुनील गावस्कर On Air ब्रिटीश कमेंटेटरला म्हणाले, बघा पुढे काय झाले, Video

Sunil Gavaskar Kohinoor, IPL 2022 : तुमच्या सरकारला सांगा आमचा कोहिनूर परत द्यायला!; सुनील गावस्कर On Air ब्रिटीश कमेंटेटरला म्हणाले, बघा पुढे काय झाले, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sunil Gavaskar Kohinoor, IPL 2022 : भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी आयपीएल सामन्यादरम्यान समालोचन करताना केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. गावस्करांनी कॉमेंट्री ऐकणे हे खूप मजेशीर असते. पण, कधीकधी त्यांच्या समालोचनात राग किंवा चुकीचे शब्दही ऐकीवास आले आहे. आता एक असाच मुद्दा गावस्करांनी समालोचन करताना उचलला आणि त्याची चर्चा रंगली आहे. राजस्थान रॉयल्सच्या लढतीदरम्यान गावस्कर यांनी समालोचन करताना ब्रिटिश समालोचक एलन विल्किंस (British commentator Alan Wilkins) यांना भारताचा 'कोहिनूर' परत देण्याचे आवाहन केले आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

राजस्थान रॉयल्सच्या डावादरम्यान गावस्कर व विल्किंस हे एकत्र समालोचन करत होते. सामना सुरू असताना कॅमेरामनने मुंबईच्या मरिन ड्राईव्हचा सुंदर व्ह्यू दाखवला. त्याला आपण क्विन ऑफ नेकलेस असे म्हणतो. यावरून गावस्करांनी ब्रिटिश  समालोचकाची मजा घेतली. गावस्कर  विल्किंसला म्हणाले, आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहतोय. त्यावर ब्रिटिश समालोचक हसू लागले.  


 

Web Title: IPL 2022 : Sunil Gavaskar ribbing Alan Wilkins about the British taking away the Kohinoor after Wilkins made a comment about Marine Drive being called the Queen’s Necklace is GOLD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.