IPL 2022 : Sunrisers Hyderabad new jersey in the IPL - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात सर्वच संघ नव्या भीडूंसह नव्या रुपात अन् नव्या जोशात मैदानावर उतरणार आहेत. अहमबाद व लखनौ या दोन नव्या संघांच्या आगमनामुळे आता जेतेपदासाठी १० संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघ १२ व १३ तारखेला होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये तगडे खेळाडू आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. नव्या खेळाडूंसहच संघात काही बदलही दिसतील आणि त्याची सुरुवात सनरायझर्स हैदराबाद संघाने ( Sunrisers Hyderabad ) केली आहे. त्यांनी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल ऑक्शनपूर्वी केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी) या खेळाडूंना आपल्या ताफ्यात कायम राखले आहे. आता त्यांना शिल्लक ६८ कोटींतून उर्वरीत २२ खेळाडू ( त्यापैकी ७ परदेशी) आपल्या ताफ्यात दाखल करून घ्यायचे आहेत. २०१६ मध्ये या संघाने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. पण, २०२१मध्ये त्यांनी याच वॉर्नरला अपमानास्पद वागणूक देताना संघाबाहेर बसवले. त्यामुळे या संघावर फॅन्स काहीसे नाराज आहेत. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी SRH नव्या वेशात आयपीएल २०२२त मैदानावर उतरणार आहे. त्यांनी बुधवारी त्यांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले.
पाहा कशी आहे ही जर्सी...