Join us  

Umran Malik, IPL 2022: 'टीम इंडिया'ला नावं ठेवणारा इंग्लंडचा क्रिकेटर भारताच्या नव्या गोलंदाजावर फिदा

उमरान मलिकने ताशी १५० किमीपेक्षाही वेगाने केली गोलंदाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 8:22 PM

Open in App

Umran Malik, IPL 2022: सनरायजर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक आपल्या वेगामुळे सतत चर्चेत असतो. या हंगामात तो सतत ताशी १४५ ते १५३ किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीचे भरपूर चाहते आहे. या चाहत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. टीम इंडियाला नेहमी नावं ठेवणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने उमरान मलिकचे अभिनंदन केले. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर त्यांनी एक ट्विट केले.

 

मायकल वॉनने या ट्विटद्वारे त्यांनी उमरान मलिकचे कौतुक केले तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सल्ला दिला. मायकल वॉनने लिहिले की, उमरान मलिक लवकरच भारतासाठी क्रिकेट खेळेल. जर मी बीसीसीआय मध्ये असतो तर मी त्याला अधिक बारकावे शिकण्यासाठी चालू हंगामातच त्याला काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी पाठवले असते. उमरान मलिकचा वेग सगळ्यांनाच आवडतो, पण उमरानची लय कधी कधी सामन्यादरम्यान बिघडलेली दिसते. यामुळेच उमरानची इकोनॉमी चालू हंगामात ४ सामन्यांमध्ये ९.७० आहे. पण तो लवकरच भारतीय संघात खेळताना दिसेल, असे वॉन ट्वीटमध्ये म्हणाला.

दरम्यान, सोमवारी गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या. हार्दिक पांड्याने एक बाजू लावून धरत ४२ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. तर अभिनव मनोहरने फटकेबाजी करत शेवटच्या टप्प्यात २१ चेंडूत ३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने ४६ चेंडूत ५७ धावांची दमदार खेळी केली. दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा यानेही ४२ धावांची खेळी केली. तर अखेरीस निकोलस पूरनने १८ चेंडूत नाबाद ३४ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादगुजरात टायटन्सकेन विल्यमसनहार्दिक पांड्या
Open in App