IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्सचे डावपेच अपयशी ठरले, बघा कॅप्टन Ravindra Jadejaने कोणावर खापर फोडले video

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात विजयाने सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले १३२ धावांचे लक्ष्य KKR ने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 12:00 AM2022-03-27T00:00:59+5:302022-03-27T00:01:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : As a batting unit, we didn't get partnerships, say Ravindra Jadeja; he creates unique IPL captaincy record, Video | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्सचे डावपेच अपयशी ठरले, बघा कॅप्टन Ravindra Jadejaने कोणावर खापर फोडले video

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्सचे डावपेच अपयशी ठरले, बघा कॅप्टन Ravindra Jadejaने कोणावर खापर फोडले video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात विजयाने सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले १३२ धावांचे लक्ष्य KKR ने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. ४० वर्षीय महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, ते पाहून सर्वांना जुना माही आठवला. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) कोलकाताचा ( Kolkata Knight Riders) कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात दम दाखवला. पण, CSK चा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja) अपयश आले. धोनी व रैना यांनी कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. जडेजाने या अपयशानंतर नाराजी व्यक्त केली.

 
महेंद्रसिंग धोनीची ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ५० धावांची खेळी अन् रवींद्र जडेजा ( २६*) व रॉबिन उथप्पा ( २८) यांच्या छोटेखानी खेळीने चेन्नई सुपर किंग्सला ४ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारून दिली. धोनी व जडेजाने अखेरच्या ३ षटकांत ४७ धावा चोपून CSK ची लाज राखली. उमेश यादवने २० धावांत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थी व आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात, KKR कडून अजिंक्य रहाणे दमदार खेळला. अजिंक्य ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर बाद झाला. वेंकटेश अय्यर ( १६), नितीश राणा ( २१), सॅम बिलिंग ( २५) व कर्णधार श्रेयस अय्यर ( २०*) यांनी विजयात वाटा उचलला. CSK कडून ड्वेन ब्राव्होने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

रवींद्र जडेजाचा विक्रम.... 
आयपीएलमध्ये सर्वाधिक २०० सामने खेळल्यानंतर कर्णधार बनलेला रवींद्र जडेजा हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी मनिष पांडेने १५३ सामने खेळल्यानंतर कर्णधारपद भूषविले होते. किरॉन पोलार्डलाही कर्णधार बनण्यासाठी १३७, आर अश्विनला १११, संजू सॅमसनला १०७ व भुवनेश्वर कुमारला १०३ सामने खेळावे लागले. 

सामन्यानंतर जडेजा म्हणाला, दव फॅक्टर महत्त्वाचा होता आणि त्यामुळेच नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम गोलंदाजी करणे पसंत करता. पहिली सहा षटकं खेळणे अवघड होते, दुसऱ्या टप्प्यात आम्ही खेळ सावरण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचा प्रयत्न केला. ड्वेन ब्राव्होने उत्तम गोलंदाजी केली आणि अन्य गोलंदाजांनीही त्यांची कामगिरी चोख बजावली. पण, फलंदाजीत आम्ही भागीदारी करू शकलो नाही. पुढील सामन्यात त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू... 

 

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : As a batting unit, we didn't get partnerships, say Ravindra Jadeja; he creates unique IPL captaincy record, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.