IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्स संकटात सापडली अन् वानखेडेवर 'ही' मिस्ट्री गर्ल फेमस झाली, पाहा Photo

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सने आघाडीचे तीनही फलंदाज गमावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 08:42 PM2022-03-26T20:42:12+5:302022-03-26T20:42:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Chennai is big big trouble, 5 down for just 61 on board, but mystery girl photo goes viral | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्स संकटात सापडली अन् वानखेडेवर 'ही' मिस्ट्री गर्ल फेमस झाली, पाहा Photo

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्स संकटात सापडली अन् वानखेडेवर 'ही' मिस्ट्री गर्ल फेमस झाली, पाहा Photo

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सने आघाडीचे तीनही फलंदाज गमावले आहेत. ऋतुराज गायकवाड ( ०), पदार्पणवीर डेव्हॉन कॉनवे ( ३) यांना उमेश यादवने माघारी पाठवल्यानंतर रॉबीन उथप्पाने डाव सावरला होता. पण, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने चपळाईने स्टम्पिंग करून CSKला मोठा धक्का दिला. उथप्पा २८ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ अंबाती रायुडूही धावबाद झाला. या विकेटमुळे चेन्नई सुपर किंग्सची अवस्था बिकट झाली, पण चर्चा मात्र त्या मिस्ट्री गर्लची सुरू झाली. IPL 2022, IPL 2022 Live Matches

कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यंदा रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.  आयपीएलमध्ये सर्वाधिक २०० सामने खेळल्यानंतर कर्णधार बनलेला रवींद्र जडेजा हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी मनिष पांडेने १५३ सामने खेळल्यानंतर कर्णधारपद भूषविले होते. किरॉन पोलार्डलाही कर्णधार बनण्यासाठी १३७, आर अश्विनला १११, संजू सॅमसनला १०७ व भुवनेश्वर कुमारला १०३ सामने खेळावे लागले. IPL T20 Matches, IPL Match CSK vs KKR Live Score

चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. उमेश यादवने तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला ( ०) बाद केले. नितीश राणाने पहिल्या स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. उमेशने पाचव्यांदा आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेतली. ऋतुराज सलग तिसऱ्या पर्वात पहिल्याच सामन्यात भोपळ्यावर बाद झालाय, पण त्यानंतर त्याची बॅट चांगली तळपलीय. २०२०मध्ये त्याने अखेरच्या सामन्यांत ६५,७२ व ६२ अशा धावा केल्या होत्या, आयपीएल २०२१मध्ये तो ऑरेंज कॅप विनर ठरला होता. उमेशने पाचव्या षटकात CSK ला आणखी एक धक्का दिला डेव्हॉन कॉनवे ( ३) अय्यरच्या हाती झेलबाद झाला. 


 रॉबिन उथप्पा ( २८) धावांवर बाद झाला. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर तो चुकला अन् यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने चपळाईने त्याला बाद केले. जीवदान मिळालेला अंबाती रायुडू ( १५) धावबाद झाला. कर्णधार जडेजा व रायुडू यांच्यातील ताळमेळ चुकल्याने KKRला ही विकेट मिळाली. असाच ताळमेळ जडेजा व शिवम दुबे यांच्यातही चुकला होता, परंतु KKRला रन आऊट करता आले नाही. मात्र, पुढच्याच चेंडूवर दुबे ( ३) आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. चेन्नईचा निम्मा संघ ६१ धावांवर तंबूत परतला होता. 

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Chennai is big big trouble, 5 down for just 61 on board, but mystery girl photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.