Join us  

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : MS Dhoni ने ४०व्या वर्षी जलवा दाखवला, पण कोलकाता नाईट रायडर्सने सहज सामना जिंकला 

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची यापेक्षा दमदार सुरूवात होऊ शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:03 PM

Open in App

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची यापेक्षा दमदार सुरूवात होऊ शकत नाही. ४० वर्षीय महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, ते पाहून सर्वांना जुना माही आठवला. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात दम दाखवला. चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) नवा कर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) किंचितसा दडपणात दिसला. आजच्या दिवसाची आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane) परतलेला आत्मविश्वास.. क्रिकेटचा परफेक्ट पॅकेज घेऊन आलेल्या KKR vs CSK लढतीने साऱ्यांचे मन जिंकले, परंतु कोलकाताने विजयाचे खाते उघडले.

उमेश यादवने चेन्नईच्या सलामीवीरांना ऋतुराज गायकवाड ( ०) व  डेव्हॉन कॉनवे ( ३) माघारी पाठवले. रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू यांनी डाव सावरला होता. पण,  रॉबिन २८ धावांवर आणि अंबाती ( १५) धावबाद झाला. शिवम दुबे ( ३)  माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ धावा अशी झाली होती. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ११ व्या षटकात मैदानावर आला अन् प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाटाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. धोनीने दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले, हे त्याचे २४वे आयपीएल अर्धशतक ठरले. चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यर सलामीला आले. फॉर्माशी झगडणारा अजिंक्य घरच्या मैदानावर आत्मविश्वासाने खेळताना दिसला. त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह अन् नटराजन षटकारने साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. चेन्नईचे गोलंदाज अपयशी ठरत असताना ड्वेन ब्राव्हो आला आणि त्याने KKR ला झटका दिला. वेंकटेश ( १६) झेलबाद झाला,  त्यानंतर नितीश राणालाही ( २१) ब्राव्होने बाद केले. अजिंक्य दमदार खेळ करत होता. मिचेल सँटनरने ही विकेट घेतली. अजिंक्य ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर बाद झाला. या विकेटनंतर CSK कमबॅक करेल असे वाटले होते, परंतु धावाच कमी झाल्याने ते पराभव टाळू शकले नाही. 

विजयासाठी १० धावांची गरज असताना ब्राव्होने तिसरी विकेट घेतली. सॅम बिलिंग २५ धावांवर बाद झाला. पण,  KKR ने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला.  

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीकोलकाता नाईट रायडर्सअजिंक्य रहाणे
Open in App