IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Dwayne Bravoची सेलिब्रेशनची नवी स्टाईल आहे लय भारी; लसिथ मलिंगाच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, Video 

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात विजयाने सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:27 PM2022-03-26T23:27:48+5:302022-03-26T23:28:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : New celebrations from Dwayne Bravo, He is now the joint highest wicket-taker in the history of the IPL, He has 170 wickets now, Video | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Dwayne Bravoची सेलिब्रेशनची नवी स्टाईल आहे लय भारी; लसिथ मलिंगाच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, Video 

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Dwayne Bravoची सेलिब्रेशनची नवी स्टाईल आहे लय भारी; लसिथ मलिंगाच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात विजयाने सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले १३२ धावांचे लक्ष्य KKR ने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. ४० वर्षीय महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) ज्या पद्धतीने फटकेबाजी केली, ते पाहून सर्वांना जुना माही आठवला. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) कोलकाताचा ( Kolkata Knight Riders) कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात दम दाखवला. अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane) परतलेला आत्मविश्वास. 'चेरी ऑन दी टॉप' म्हणायचे तर ३८ वर्षीय  ड्वेन ब्राव्होची ( Dwayne Bravo) सेलिब्रेशनची नवी स्टाईल.

महेंद्रसिंग धोनीची ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ५० धावांची खेळी अन् रवींद्र जडेजा ( २६*) व रॉबिन उथप्पा ( २८) यांच्या छोटेखानी खेळीने चेन्नई सुपर किंग्सला ४ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारून दिली. धोनी व जडेजाने अखेरच्या ३ षटकांत ४७ धावा चोपून CSK ची लाज राखली. उमेश यादवने २० धावांत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थी व आंद्रे रसेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात, KKR कडून अजिंक्य रहाणे दमदार खेळला. अजिंक्य ३४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर बाद झाला. वेंकटेश अय्यर ( १६), नितीश राणा ( २१), सॅम बिलिंग ( २५) व कर्णधार श्रेयस अय्यर ( २०*) यांनी विजयात वाटा उचलला. CSK कडून ड्वेन ब्राव्होने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या.

ड्वेन ब्राव्होनचं सेलिब्रेशन अन् लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत लसिथ मलिंगा आघाडीवर आहे. आज ब्राव्होने ३ विकेट्स घेत मलिंगाच्या १७० विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. अमित मिश्रा ( १६६), पीयूष चावला ( १५७) व हरभजन सिंग ( १५०) हे अव्वल पाचमध्ये आहेत. 

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : New celebrations from Dwayne Bravo, He is now the joint highest wicket-taker in the history of the IPL, He has 170 wickets now, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.