IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knigth Riders) आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात कमाल दाखवून दिली. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या KKRने चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) कोंडी केली. CSKचा निम्मा संघ त्यांनी ६१ धावांवर माघारी पाठवून सामन्यावर पकड मजबूत केली. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी व कर्णधार रवींद्र जडेजा हे खेळपट्टीवर असूनही फार कमाल दाखवू शकले नाही. KKRच्या गोलंदाजांना त्याचे श्रेय द्यायला हवे. त्यांनी चेन्नईच्या धावांवर लगाम लावला. पण, धोनीने ( MS Dhoni) दोन वर्षांनंतर पहिले अर्धशतक झळकावताना CSK ची लाज वाचवली. IPL 2022, IPL 2022 Live Matches
चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. उमेश यादवने तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला ( ०) बाद केले. नितीश राणाने पहिल्या स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. उमेशने पाचव्यांदा आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेतली. उमेशने पाचव्या षटकात CSK ला आणखी एक धक्का दिला डेव्हॉन कॉनवे ( ३) अय्यरच्या हाती झेलबाद झाला. रॉबिन उथप्पा ( २८) धावांवर बाद झाला. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर तो चुकला अन् यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने चपळाईने त्याला बाद केले. जीवदान मिळालेला अंबाती रायुडू ( १५) धावबाद झाला. कर्णधार जडेजा व रायुडू यांच्यातील ताळमेळ चुकल्याने KKRला ही विकेट मिळाली. असाच ताळमेळ जडेजा व शिवम दुबे यांच्यातही चुकला होता, परंतु KKRला रन आऊट करता आले नाही. मात्र, पुढच्याच चेंडूवर दुबे ( ३) आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. चेन्नईचा निम्मा संघ ६१ धावांवर तंबूत परतला होता. IPL T20 Matches, IPL Match CSK vs KKR Live Score
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ११ व्या षटकात मैदानावर आला अन् प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाटाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. पण KKRच्या गोलंदाजांनी एवढी सुरेख गोलंदाजी केली की CSK ला मोठी धावसंख्या उभारताच आली नाही. नेट्समध्ये खणखणीत षटकार खेचणाऱ्या धोनीचा खेळ प्रत्यक्षात संथ जाणवला. वरुण चक्रवर्थी, सुनील नरीन, आंद्रे रसेल, उमेश यादव यांची गोलंदाजी सुरेख झाली. धोनी व जडेजाने अर्धशतकी भागीदारी केली. सेट झालेल्या धोनीने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. धोनीने दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले, हे त्याचे २४वे आयपीएल अर्धशतक ठरले. चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्याय