IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : ४,१,४,०,४,१,४,६,०,२,४,४,१!; MS Dhoni अखेरच्या १३ चेंडूंवर बरसला, 'Thala' च्या Videoने धुमाकुळ घातला

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:36 PM2022-03-26T22:36:54+5:302022-03-26T22:37:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Score card Updates : MS Dhoni last 13 balls -4,1,4,0,4,1,4,6,0,2,4,4,1; CSK scored 47 runs in last 3 overs, Watch Video  | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : ४,१,४,०,४,१,४,६,०,२,४,४,१!; MS Dhoni अखेरच्या १३ चेंडूंवर बरसला, 'Thala' च्या Videoने धुमाकुळ घातला

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : ४,१,४,०,४,१,४,६,०,२,४,४,१!; MS Dhoni अखेरच्या १३ चेंडूंवर बरसला, 'Thala' च्या Videoने धुमाकुळ घातला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knigth Riders मेहनतीवर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पाणी फिरवले. १७व्या षटकापर्यंत ५ बाद ८४ धावा असलेल्या CSKने अखेरच्या तीन षटकांत खोऱ्याने धावा चोपल्या. २५ चेंडूंत १५ धावांवर खेळणाऱ्या धोनीने त्या तीन षटकांत दमदार खेळ केला आणि संघाला ५ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली. धोनीच्या 

उमेश यादवने चेन्नईच्या सलामीवीरांना ऋतुराज गायकवाड ( ०) व  डेव्हॉन कॉनवे ( ३) माघारी पाठवले. रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू यांनी डाव सावरला होता. पण,  रॉबिन २८ धावांवर आणि अंबाती ( १५) धावबाद झाला. शिवम दुबे ( ३)  माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ धावा अशी झाली होती. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ११ व्या षटकात मैदानावर आला अन् प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाटाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. धोनीने दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले, हे त्याचे २४वे आयपीएल अर्धशतक ठरले. चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या. 

पाहा  MS Dhoni ची दमदार बॅटींग 
 


आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा धोनी हा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला. धोनीने ४० वर्षे व २६२ दिवसांचा असताना हा पराक्रम करताना राहुल द्रविडचा ( ४० वर्ष व ११६ दिवस) विक्रम मोडला. आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा वयस्कर खेळाडू हा अॅडम गिलख्रिस्ट आहे. त्याने ४१ वर्ष व १८१ दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती. त्यानंतर ख्रिस गेल (  ४१ वर्ष व ३९ दिवस) याचा क्रमांक येतो.  सचिन तेंडुलकर ( ३९ वर्ष व ३६२ दिवस) या यादीत पाचवा येतो. 

Web Title: IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Score card Updates : MS Dhoni last 13 balls -4,1,4,0,4,1,4,6,0,2,4,4,1; CSK scored 47 runs in last 3 overs, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.