Join us  

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Sheldon Jackson ने भारी स्टम्पिंग केली, फॅन बनलेल्या सचिन तेंडुलकरला MS Dhoni ची आठवण झाली, Video

१७व्या षटकापर्यंत ५ बाद ८४ धावा असलेल्या CSKने अखेरच्या तीन षटकांत खोऱ्याने धावा चोपल्या. २५ चेंडूंत १५ धावांवर खेळणाऱ्या धोनीने त्या तीन षटकांत दमदार खेळ केला आणि संघाला ५ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:05 PM

Open in App

 IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knigth Riders मेहनतीवर चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पाणी फिरवले. १७व्या षटकापर्यंत ५ बाद ८४ धावा असलेल्या CSKने अखेरच्या तीन षटकांत खोऱ्याने धावा चोपल्या. २५ चेंडूंत १५ धावांवर खेळणाऱ्या धोनीने त्या तीन षटकांत दमदार खेळ केला आणि संघाला ५ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात संधी मिळालेल्या शेल्डन जॅक्सनने ( Sheldon Jackson) कमालीची स्टम्पिंग करून साऱ्यांचे लक्ष वेधवे.  

उमेश यादवने चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीचे दोन धक्के दिले. ऋतुराज गायकवाड ( ०) व  डेव्हॉन कॉनवे ( ३) हे बाद झाल्यानंतर रॉबिन उथप्पा व अंबाती रायुडू यांनी डाव सावरला होता. पण,  रॉबिन उथप्पा  २८  धावांवर बाद झाला. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर तो चुकला अन् यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सनने चपळाईने त्याला बाद केले. अंबाती रायुडू ( १५) धावबाद झाला. शिवम दुबे ( ३)  माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ धावा अशी झाली होती. जॅक्सनच्या या चपळाईचा सचिन तेंडुलकरही ( Sachin Tendulkar) फॅन बनला आणि त्याला MS Dhoni आठवला.

शेल्डन जॅक्सन हा नावावरून जरी परदेशी खेळाडू वाटत असला तरी तो भारयीत आहे. गुजरातच्या भावनगरमधील त्याला जन्म आणि तो स्थानिक स्पर्धांमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ७९ सामन्यांत ५०.३९च्या सरासरीने ५९४७ धावा केल्या आहेत आणि त्यात १९ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६७ सामन्यांत २३४६ धावांसह ८ शतकं व १२ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. ट्वेंटी-२०तही त्याने ६२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतकही आहे. 

पाहा व्हिडीओ...

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ११ व्या षटकात मैदानावर आला अन् प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाटाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. धोनीने दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले, हे त्याचे २४वे आयपीएल अर्धशतक ठरले. चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्समहेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकर
Open in App