IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) हे इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. अशात CSKच्या ताफ्यात अष्टपैलू मोईन अली ( Moeen Ali) परतल्याने कर्णधार रवींद्र जडेजाची ताकद बळावली आहे. त्यामुळे LSGचा कर्णधार लोकेश राहुलची डोकेदुखी वाढली आहे.
CSK vs LSG हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. लोकेश राहुल आणि क्विंटन डीकॉक पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. त्यामुळे चेन्नईविरुद्ध मोठी खेळी करण्यास दोघेही उत्सुक असतील. मनीष पांड्ये आणि एव्हिन लुईस यांच्या उपस्थितीत लखनौची फलंदाजी मजबूत दिसते. मात्र, पहिल्या सामन्यात तेही अपयशी ठरले होते. दीपक हुडा व आयुष बदोनी यांच्यासह कृणाल पांड्याने मधल्या फळीत दमदार योगदान दिल्याने लखनौची फलंदाजी खोलवर असल्याचे दिसून आले. लखनौला गोलंदाजीतही सुधारणा करावी लागेल.
दुसरीकडे, चेन्नईची स्थितीही फारशी चांगली नाही. महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार रवींद्र जडेजा या अनुभवी फलंदाजांचा अपवाद वगळता ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबारी रायुडू आणि डिव्हॉन कॉनवे अपयशी ठरले होते. मोईन अलीच्या पुनरागमनाने चेन्नई संघाची बाजू बळकट झाली आहे. तसेच ड्वेन प्रिटोरियसही संघ निवडीसाठी उपलब्ध असेल. लखनौच्या ताफ्यातही एक बदल दिसत आहे आणि मार्क वूडला रिप्लेसमेंट म्हणून आयपीएलमध्ये आलेला अँड्य्रू टाय आज पदार्पण करणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियसही , मुकेश चौधरी, तुषार देशपांडे
लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, कृणाल पांड्या, एव्हिन लुईस, मनिष पांडे, दीपक हुडा, आयुश बदोनी, आवेश खान, अँण्ड्य्रू टाय, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमिरा