IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेले गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) यांच्यात लढत रंगणार आहे. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्व सोपवले गेले आहे. पंजाब किंग्सचा माजी कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यंदा लखनौ सुपर जायंट्सचे ( LSG) नेतृत्व सांभाळणार आहे. दोन्ही संघ नवीन असल्याने ते कोणत्या खेळाडूंसह मैदानावर उतरतील याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. हार्दिक आज सामन्यापूर्वी गोलंदाजी करताना दिसला. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या, राशीद खान व शुबमन गिल या खेळाडूंना लिलावाआधी करारबद्ध केले. त्यानंतर त्यांनी राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, अल्झारी जोसेफ, मोहम्मस शमी यांना करारबद्ध केले. आयपीएलपूर्वी जेसन रॉयने माघार घेतल्याने गुजरातचे टेंशन वाढले आहे. दुसरीकडे लखनौने ऑक्शनआधी लोकेशसह मार्कस स्टॉयनिस व रवी बिष्णोई यांनी करारबद्ध केले आहे. मनिष पांडे, दीपक हुडा व कृणाल पांड्या हे भारतीय स्टार लखनौचे सदस्य आहेत. दीपक व कृणाल हे दोघं कट्टर वैरी एकाच संघाकडून खेळणार आहेत.
आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स राशिद खान, ल्युकी फर्ग्युसन, मॅथ्यू वेड व डेव्हिड मिलर या परदेशी खेळाडूंसह उतरणार आहेत, तर लखनौ सुपर जायंट्स एव्हिन लुईस, क्विंटन डी कॉक व दुष्मंथ चमिरा या तीनच खेळाडूंसह खेळणार आहेत.
लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, कृणाल पांड्या, एव्हिन लुईस, मनिष पांडे, दीपक हुडा, आयुश बदोनी, आवेश खान, मोहसीन खान, रवी बिश्नोई व दुष्मंथा चमिरा
गुजरात टायटन्स - शुबमन गिल, मॅथ्यू वेड, विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, वरुण आरोन, ल्युकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी
Web Title: IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : Hardik Pandya and KL Rahul exchange their jersey, Gujarat won the toss and decided to bowl first, know playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.