Join us  

Moment Of The IPL 2022 LSG vs GT Live : Krunal Pandya ने दीपक हुडाला मिठी मारली अन् सोशल मीडियावर मीम्सची बरसात झाली, जाणून घ्या कारण

आयपीएल ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने ८.२५ कोटींत कृणालला आपल्या ताफ्यात घेतले, त्यानंतर दीपक हुडासाठी त्यांनी ५.७५ कोटी मोजले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:26 PM

Open in App

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : दीपक हुडा, आयूष बदोनी यांची फटकेबाजी राहिली बाजूला लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्या लढतीत वेगळ्याच फोटोची रंगली चर्चा... कृणाल पांड्याने ( Krunal Pandya) आजच्या सामन्यात दीपक हुडाला ( Deepak Hooda) ला मालेली मिठी चर्चेत आली. दीपक फलंदाजी करत असताना डग आऊटमध्ये बसून कृणाल त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसला, बाद होऊन दीपक पेव्हेलियनमध्ये जात असताना कृणालने त्याची पाठ थोपटली अन् नंतर कॅच घेतल्यावर त्याला मिठी मारली. सहकारी असे वागले तर त्यात नवल काही नाही, परंतु हे दोघं असे वागताना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय...

आयपीएल ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने ८.२५ कोटींत कृणालला आपल्या ताफ्यात घेतले, त्यानंतर दीपक हुडासाठी त्यांनी ५.७५ कोटी मोजले. एकेकाळचे हे कट्टर वैरी एकाच संघातून खेळणार असल्याने सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. आज प्रत्यक्ष त्यांना खेळताना पाहिल्यानंतर हे दोघं कसं जमवून घेतील, याची उत्सुकता साऱ्यांना होती. कृणाल VS दीपक नेमकं काय आहे भांडण?सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२०त बडोदा संघ वादामुळे चर्चेत आला होता. संघातील टॉप खेळाडू दीपक हुडानं या स्पर्धेतून माघार घेतली होती आणि त्यानं कर्णधार कृणाल पांड्या ( Krunal Pandya) यानं सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. उप कर्णधार दीपक हुडानं बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे लेखी तक्रार केली होती. वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना दीपक आणि कृणाल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दीपकनं बडोदा क्रिकेट असोसिएशनला मेल करून कृणालनं शिवीगाळ केल्याचा आरोप केला. शिवाय त्यानं या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :आयपीएल २०२२क्रुणाल पांड्यालखनौ सुपर जायंट्सगुजरात टायटन्स
Open in App