Join us  

Rohit Sharma, IPL 2022 T20 Match MI vs DC Live : Mumbai Indiansला २०१२ पासून IPLचा पहिला सामना जिंकता आलेला नाही?; रोहित शर्माचे भन्नाट उत्तर

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात मोजलेली रक्कम आज इशान किशनने ( Ishan Kishan) योग्य ठरवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 7:54 PM

Open in App

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात मोजलेली रक्कम आज इशान किशनने ( Ishan Kishan) योग्य ठरवली. त्याच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) ५ बाद १७७ धावांचा डोंगर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) समोर उभा केला. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व ललित यादव ( Lalit Yadav) या जोडीने दिल्लीला दणदणीत विजय मिळवून दिला. २०१२नंतर MI ला आयपीएलमधील पहिली लढत जिंकता आलेली नाही, या प्रश्नावर रोहित शर्माने ( Rohit Sharma) भारी उत्तर दिले.दिल्ली कॅपिटल्सने दाखवलेला विश्वास कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) सार्थ ठरवला. त्याने रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि किरॉन पोलार्ड या तगड्या खेळाडूंना बाद केले. कुलदीपने त्याच्या चार षटकांत १८ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. रोहित ४१ धावांवर माघारी परतला आणि त्याने इशानसह पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. अनमोलप्रीत ( ८) व पोलार्ड ( ३) झटपट माघारी परतले. पदार्पणवीर तिलक वर्माने सुरेख फटके मारताना २२ धावा केल्या, परंतु खलिल अहमदने त्याला बाद केले. इशानने अर्धशतकी खेळी करून मुंबईला मोठा पल्ला गाठून दिला. इशानने ४८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८१ धावा केल्या.  

मुंबईच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे ६ फलंदाज १०४ धावांवर माघारी परतले होते. पृथ्वी शॉ ( ३८) व टीम सेइफर्ट ( २१) यांनी चांगली सुरुवात करून दिली खरी, परंतु मुरुगन अश्विन व बसील थम्पी यांनी धक्के दिले. शार्दूल ठाकूरही २२ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल व ललित यादव ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागादारी करून संघाला ४ विकेट्स व १० चेंडू राखून विजय मिळवून दिला. यादव ४८ धावांवर, तर पटेल १७ चेंडूंत ३८ धावांवर नाबाद राहिले. बसील थम्पीने ३ व अश्विनने दोन विकेट्स घेतल्या.

रोहित शर्मा काय म्हणाला?''मला वाटलं या धावसंख्या पुरेशा असतील.. या खेळपट्टीवर १७०+ धावा होतील, असे मलाही वाटले नव्हते, परंतु आम्ही चांगला खेळ केला. फक्त गोलंदाजांनी त्यानुसार गोलंदाजी केली नाही. २०१२पासून आम्ही पहिला सामना जिंकलेलो नाही, यावर आम्ही कधीच चर्चा करत नाही. आम्ही तयारी करूनच मैदानावर उतरतो, मग तो पहिला सामना असो किंवा अखेरचा. प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो. क्षेत्ररक्षणातही आमच्याकडून काही चूका झाला. पण, अशा गोष्टी घडत असतात. या निकालाने निराश नक्की झालोय, परंतु हा शेवट नाही.''   

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सरोहित शर्मादिल्ली कॅपिटल्स
Open in App