Join us  

Who is Akash Deep?, IPL 2022 RCB vs KKR Live : अर्धांगवायूचा झटका आलेल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तो तीन वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला अन् आज RCBचा स्टार बनला

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीची काही षटकं सुरेख टाकताना कोलकाता नाईट रायडर्सच्या धावगतीवर लगाम लावली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 30, 2022 8:22 PM

Open in App

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने  (Royal Challengers Bangalore) डी वाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सची ( Kolkata Knight Riders) पहिल्या 7 षटकांत कोंडी केली. आकाश दीप  ( Akash Deep) हा RCBसाठी सप्राईज पॅकेज ठरला आणि त्याने KKRच्या दोन प्रमुख फलंदाजांना बाद करून मोठं काम केलं. मोहम्मद सिराज व डेव्हिड विली हे अनुभवी व स्टार गोलंदाज असताना आजच्या सामन्यात हवा करणारा आकाश दीप आहे कोण?

बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीची काही षटकं सुरेख टाकताना कोलकाता नाईट रायडर्सच्या धावगतीवर लगाम लावली आहे. डेव्हिड विली एका बाजूने भन्नाट मारा करताना वेंकटेश अय्यर व अजिंक्य रहाणे यांना मुक्तपणे खेळू देत नाही. दुसरीकडे मोहम्मद सिराज टिच्चून मारा करताना पहिल्याच षटकात KKRच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण केले होते. अजिंक्य रहाणे व वेंकटेश यांनी सावध सुरुवात केली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेंकटेशने पॉईंटच्या दिशेने सुरेख चौकार खेचला.

चौथ्या षटकात सिराजच्या जागी आकाश दीपला गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर वेंकटेशला कॉट अॅन बोल्ड केले. वेंकटेश 10 धावांवर माघारी परतला. सिराजला पुन्हा दुसऱ्या एंडवरून गोलंदाजीला आणले आणि त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर याचा झेल सोडला. पण, त्याच षटकात त्याने अजिंक्यला (9) माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने पहिलाच चेंडू सीमारेषेपार भिरकावला, परंतु आकाश दीपने पाचव्या चेंडूवर त्याला माघारी पाठवून KKRला मोठा धक्का दिला. डेव्हिड व्हिलीने अफलातून झेल घेतला. KKR चे 4 फलंदाज 46 धावांवर माघारी परतले.

कोण आहे आकाश दीप?आकाश दीपने आयपीएल 2022मध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पदार्पण केले. 25 वर्षईय गोलंदाजाला 20 लाखांत RCBने आपल्या ताफ्यात घेतले. मुळचा बिहारचा, परंतु स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकाशने 2019मध्ये महाराष्ट्रविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 21 ट्वेंटी-20त 26 विकेट्स घेतल्या आहेत. 2010मध्ये तो बंगालमध्ये आला आणि क्रिकेटला सुरुवात केली. अर्धांगवायूचा झटका आलेल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तो 3 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता,  2020च्या आयपीएलमध्ये तो RCBचा नेट बॉलर होता. 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स
Open in App