Virat Kohli Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs KKR Live : 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू दमले; कोलकाताविरुद्ध कसेबसे जिंकले

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने डी वाय पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग 2022मधील पहिला विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:23 PM2022-03-30T23:23:13+5:302022-03-30T23:31:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : RCB have done it, they've defeated KKR by 3 wickets. What a game, a low scoring thriller | Virat Kohli Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs KKR Live : 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू दमले; कोलकाताविरुद्ध कसेबसे जिंकले

Virat Kohli Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs KKR Live : 129 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू दमले; कोलकाताविरुद्ध कसेबसे जिंकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने  (Royal Challengers Bangalore) डी वाय पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग 2022मधील पहिला विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) बॅकफूटवर फेकले. पहिल्या सामन्यात 200+ धावा करूनही पराभव पत्करावा लागलेल्या RCBची आज विजयासाठी 129 धावांचा पाठलाग करताना चांगली दमछाक झाली. अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) बंगळुरूला मॅच जिंकून दिली. 

नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश दीप, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल,  मोहम्मद सिराज व डेव्हिड व्हीली यांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. वेंकटेश अय्यर ( 10) व अजिंक्य रहाणे ( 9)  हे झटपट माघारी परतले. श्रेयस अय्यर ( 13), सुनील नरीन  ( 12) व शेल्डन जॅक्सन ( 0) यांना वनिंदू हसरंगाने बाद केले. आकाश दीपने , हर्षलने 2 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलने  3 खणखणीत षटकार खेचून KKRच्या फॅन्सना दिलासाही दिला. पण, हर्षल पटेलने त्याची ( 25) विकेट घेतली. हसरंगाने सर्वाधिक 4 विकेट्स टिपल्या. उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांनी अखेरची चार षटकं खेळून काढताना कोलकाताला 18.5 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांनी 27 धावांची भागीदारी केली.


कोलकाताच्या गोलंदाजांनीही पलटवार केला. उमेश यादवने पहिल्याच षटकात अनुज रावत ( 0) ला बाद केले आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात विराट कोहलीची  (12)  विकेट घेतली. आज पदार्पण करणाऱ्या टीम साऊदीने RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला ( 5) बाद करून मोठा धक्का दिला. RCBचे आघाडीचे तिनही फलंदाज 17 धावांवर माघारी परतले. डेव्हिड विली व शेर्फाने रुथरफोर्ड यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करताना बंगळुरूच्या डावाला आकार दिला. विली व रुथरफोर्डने या भागीदारीत काही सुरेख फटकेही मारले. पण, सुनील नरीनने ही जोडी तोडली. त्याने 18 धावांवर खेळणाऱ्या विलीला सोपा झेल देण्यास भाग पाडले.
शाहबाज अहमद व रुथरफोर्ड हे विकेट टिकवून तर खेळत होते, परंतु त्यांना धावांचा वेग वाढवता येत नव्हता.

त्यामुळे बंगळुरूच्या फलंदाजांवर दडपण निर्माण झालेले दिसले. 16व्या षटकाला अहमदने धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात वरुण चक्रवर्थीला खणखणीत षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो स्टम्पिंग झाला. अहमदने 3 षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. बंगळुरूला आता 4 षटकांत 28 धावा करायच्या होत्या आणि मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला. टीम साऊदीने 18व्या षटकात रुथरफोर्डला ( 28) माघारी पाठवून RCBच्या अडचणी वाढवल्या. त्याच षटकात वनिंदू हसरंगाही 4 धावा करून रसेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. साऊदीनं 4 षटकांत 20 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. सुनील नरीनने 12 धावांत 1 विकेट घेत कंजूस गोलंदाजी केली. 


19व्या षटकात कार्तिकला रन आऊट करण्याची सोपी संधी कोलकाताने गमावली. पुढच्याच षटकात हर्षल पटेलने यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चौकार मिळवला. वेंकटेश अय्यरने दोन बॉल निर्धाव फेकल्यानंतर हर्षलने सहावा चेंडू चौकार मारला आणि आता बंगळुरूला 6 चेंडूंत 7 धावा करायच्या होत्या. उमेश यादवने 16 धावांत 2 विकेट्स घेतल्या. अखेरचे षटक फेकण्यासाठी आंद्रे रसेल आला आणि कार्तिकने पहिलाच चेंडू षटकार खेचला. बंगळुरूने 3 विकेट्स राखून हा सामना जिकला. 

Web Title: IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : RCB have done it, they've defeated KKR by 3 wickets. What a game, a low scoring thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.