Faf du Plessis, IPL 2022 RCB vs KKR Live : फॅफ ड्यू प्लेसिसपाठोपाठ Virat Kohliही माघारी परतला, तरुणीचा जीव वर खाली झाला, Video 

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: RCBचे आघाडीचे तिनही फलंदाज 17 धावांवर माघारी परतले.

By स्वदेश घाणेकर | Published: March 30, 2022 10:08 PM2022-03-30T22:08:45+5:302022-03-30T22:11:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Umesh Yadav and Tim Southee on a roll, RCB 17 for 3 with Faf du Plessis, Anuj Rawat and Viratl Kohli back in the dressing room, Video  | Faf du Plessis, IPL 2022 RCB vs KKR Live : फॅफ ड्यू प्लेसिसपाठोपाठ Virat Kohliही माघारी परतला, तरुणीचा जीव वर खाली झाला, Video 

Faf du Plessis, IPL 2022 RCB vs KKR Live : फॅफ ड्यू प्लेसिसपाठोपाठ Virat Kohliही माघारी परतला, तरुणीचा जीव वर खाली झाला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: कोलकाताच्या गोलंदाजांनीही पलटवार केला. उमेश यादवने पहिल्याच षटकात अनुज रावत ( 0) ला बाद केले आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात विराट कोहलीची  (12)  विकेट घेतली. आज पदार्पण करणाऱ्या टीम साऊदीने RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला ( 5) बाद करून मोठा धक्का दिला. RCBचे आघाडीचे तिनही फलंदाज 17 धावांवर माघारी परतले. RCBही ही अवस्था पाहून डी वाय पाटील स्टेडियमवर उपस्थित तरुणीचा जीव वर खाली झाला. कॅमेरामनने अगदी त्याच क्षणी कॅमेरा तिच्याकडे वळवला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने  (Royal Challengers Bangalore) डी वाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) बॅकफूटवर फेकले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश दीप, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल,  मोहम्मद सिराज व डेव्हिड व्हीली यांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. वेंकटेश अय्यर ( 10) व अजिंक्य रहाणे ( 9)  हे झटपट माघारी परतले. आकाश दीपने 45 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. 

श्रेयस अय्यर ( 13), सुनील नरीन  ( 12) व शेल्डन जॅक्सन ( 0) यांना वनिंदू हसरंगाने बाद केले. हर्षल पटेलने 11 धावांत 2 विकेट्स घेत हारभार लावला. आंद्रे रसेलने  3 खणखणीत षटकार खेचून KKRच्या फॅन्सना दिलासाही दिला. पण, हर्षल पटेलने त्याची ( 25) विकेट घेतली. हसरंगाने 20 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स टिपल्या. उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांनी अखेरची चार षटकं खेळून काढताना कोलकाताला 18.5 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांनी 27 धावांची भागीदारी केली.

 पाहा व्हिडीओ...



 

Web Title: IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Umesh Yadav and Tim Southee on a roll, RCB 17 for 3 with Faf du Plessis, Anuj Rawat and Viratl Kohli back in the dressing room, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.