Disha patani, IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पंजाब किंग्स भिडणार; दिशा पाटणी म्हणते, मी 'या' संघासाठी चिअर करणार

विराट कोहली  ( Virat Kohli) ९ वर्षांत प्रथमच RCBचा खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:37 PM2022-03-27T18:37:46+5:302022-03-27T18:55:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match RCB vs PBKSLive Score card Updates : Disha patani in star sports said she will be supporting RCB this year IPL 2022 | Disha patani, IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पंजाब किंग्स भिडणार; दिशा पाटणी म्हणते, मी 'या' संघासाठी चिअर करणार

Disha patani, IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पंजाब किंग्स भिडणार; दिशा पाटणी म्हणते, मी 'या' संघासाठी चिअर करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्याच डबर हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स ( Royal Challengers Bangalore Vs Punjab Kings) असा सामना सायंकाळी डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. विराट कोहली  ( Virat Kohli) ९ वर्षांत प्रथमच RCBचा खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे. यंदा फॅफ  ड्यू प्लेसिसकडे RCBकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पंजाब किंग्सही ( PBKS) मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, या सामन्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी ( Disha Patani) कोणाला चिअर करणार?; यंदा तिने यापैकी एका संघाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.  

कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेला विराट खोऱ्याने धावा काढून RCB ला पहिले जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात असेल. RCB आणि PBKSला फाफ डुप्लेसिस आणि मयांक अग्रवाल यांच्या रूपात नवे कर्णधार लाभले, तरी सामन्याचे आकर्षण कोहलीच असेल. कोहलीने २०१३ ला न्यूझीलंडचा डॅनियल व्हेट्टोरीकडून नेतृत्व स्वीकारले. आठ सत्रात नेतृत्व केल्यानंतर जबाबदारीतून तो मोकळा झाला. कोहलीच्या नेतृत्वात संघाने २०१६ ला उपविजेतेपदाचा मान मिळविला होता. त्यावेळी विराटने चार शतकांसह ९०० धावा काढल्या होत्या. डुप्लेसिसला पहिल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवूड यांची उणीव जाणवेल. श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा आणि दिनेश कार्तिक यांच्यावरही नजर असेल. 

पंजाबला बेयरेस्टो याची उणीव जाणवेल. तो इंग्लंड संघातून विंडीजविरुद्ध खेळत असून, दुसरा सहकारी कॅगिसो रबाडा बांगलादेशविरुद्ध मायदेशातील मालिकेत व्यस्त आहे. मात्र, युवा आणि नवोदित खेळाडूंच्या ताकदीवर पंजाब बाजी मारू शकतो. या सामन्यात दिशा पाटणी RCBला चिअर करणार आहे. IPL 2022मध्ये तिचा पाठिंबा RCBला असणार आहे, हे तिने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सांगितले.

Web Title: IPL 2022 T20 Match RCB vs PBKSLive Score card Updates : Disha patani in star sports said she will be supporting RCB this year IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.