Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर 

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:23 PM2022-03-29T21:23:24+5:302022-03-29T21:24:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals finishes with outstanding total of 210/6, Sanju Samson - 55 in just 27 balls with 5 sixes  | Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर 

Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. जोस बटलर ( Jose Buttler )  व यशस्वी जैस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर संजू व देवदत्त पडिक्कल यांची फटकेबाजी सनरायझर्स हैदराबादसाठी ( Sunrisers Hyderabad ) डोकेदुखी ठरली. संजूने तर ८ चेंडूंत ४२ धावा चोपून RRला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. शिमरोन हेटमायरनेही दमदार खेळ केला. 


सनरायझर्स हैदराबादने मिळवलेली पहिली विकेट NO Ball मुळे नाकारली गेली असली तरी त्यांनी हळुहळू सामन्यावर पकड घेतली. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जोस बटलर व यशस्वी जैस्वाल SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी  ६ षटकांत ५८ धावा जोडल्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात बटलरला झेलबाद केले होते, परंतु तो नो बॉल ठरला. जीवदान मिळाल्यावर बटलस सुसाट सुटला.. त्याने उम्रान मलिकच्या १४८kmph च्या वेगाने येणाऱ्या चेंडूवर तुफान फटकेबाजी केली. त्याच्या एका षटकात २० धावा चोपल्या. आयपीएलमध्ये २००० धावांचा पल्ला ओलांडणारा बटरल हा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला. 

यशस्वी ७व्या षटकाच्या रोमारिओ शेफर्डच्या ( Romario Shepherd ) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने १६ चेंडूंत २० धावा केल्या.  मलिकच्या पहिल्याच षटकाट बटलरने फटकेबाजी केली, त्यानेच SRHला दुसरे यश मिळवून दिले.  जोस बटलर २८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) अन् RCBचा माजी सलामीवीर देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) यांनी धावांचा पाऊस सुरूच ठेवला. वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर संजूने मारलेला षटकार लाजवाब होता. संजू व देवदत्त यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३०  चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.  स्टेडियमचा असा एकही कोपरा नाही, जिथे या दोघांनी फटके मारले नसतील.

मलिकने आजच्या सामन्यातील दुसरी विकेट घेताना RRची सेट जोडी तोडली. देवदत्त २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, संजूचे मनसूबे तेच राहिले. त्याने पुढील षटकात वॉशिंग्टनला सलग दोन षटकार खेचून २५ चेंडूंत आयपीएलमधील १६वे अर्धशतक पूर्ण केले. SRHने अनुभवी गोलंदाज भुवीला आणले आणि त्याने १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संजूला आऊट केले.  संजू २७ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. याच षटकात चौथ्या चेंडूवर शिमरोन हेटमायरसाठी भुवीने DRS वाया घालवला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रियान परागसाठी घेतलेला DRS ही वाया गेला. शिमरोन हेटमायर व रियान पराग यांनीही हात साफ करताना RRला ६ बाद २१० धावांपर्यंत मजल मारून दिली. हेटमायरने १३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावा चोपल्या. टी नटराजनने २०व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. 


 

Web Title: IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals finishes with outstanding total of 210/6, Sanju Samson - 55 in just 27 balls with 5 sixes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.