IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

 केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:16 PM2022-03-29T23:16:06+5:302022-03-29T23:16:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals have defeated Sunrisers Hyderabad by 61 runs, Kane williamson Controversial wicket | IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card:  केन विलियम्सला ( Kane Williamson) ची वादग्रस्त विकेट वगळल्यास आयपीएल २०२२मधील आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) निर्विवाद वर्चस्व गाजवले. संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर RRने सनरायझर्स हैदराबादसमोर ( Sunrisers Hyderabad) विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले. पण, त्यानंतर RRचे गोलंदाज युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal), प्रसिद्ध कृष्णा व आर अश्विन यांनी चांगली कामगिरी केली. SRHचा निम्मा संघ ३७ धावांवर माघारी पाठवून RRने विजय पक्का केला आणि नंतरचा खेळ केवळ औपचारिक ठरला. आयपीएल २०२२मध्ये धावांचा बचाव करून  विजय मिळवणारा RR हा पहिलाच संघ ठरला. 

राजस्थान रॉयल्सकडून ( Rajasthan Royals) १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या कर्णधार संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) आतषबाजीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. जोस बटलर ( Jose Buttler )  व यशस्वी जैस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर संजू व देवदत्त पडिक्कल यांची फटकेबाजी सनरायझर्स हैदराबादसाठी ( Sunrisers Hyderabad ) डोकेदुखी ठरली. संजूने तर ८ चेंडूंत ४२ धावा चोपून RRला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. शिमरोन हेटमायरनेही तुफान फटकेबाजी करून राजस्थानची धावसंख्या दोनशेपार नेली. 

NO Ball मुळे जीवदान मिळालेल्या जोस बटलर व यशस्वी जैस्वाल SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी  ६ षटकांत ५८ धावा जोडल्या. यशस्वी ( २०) ७व्या षटकाच्या रोमारिओ शेफर्डच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बटलरने ३५ धावा केल्या.  कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) अन्  देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) यांनी धावांचा पाऊस पाडला आणि ४१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, संजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. शिमरोन हेटमायर व रियान पराग यांनीही हात साफ करताना RRला ६ बाद २१० धावांपर्यंत मजल मारून दिली. हेटमायरने १३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३३ धावा चोपल्या.  


राजस्थान रॉयल्सच्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर SRHचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson ) याच्या बॅटची किनार घेत चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने गेला. पण, संजूच्या हातून तो चेंडू निसटला आणि स्लीपमध्ये उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलने ( Devdutta Padikkal) प्रसंगावधन दाखवताना चेंडू टिपला. तिसऱ्या अम्पायरने निर्णय राजस्थानच्या पक्षात दिला आणि हा निर्णय वादात अडकला. SRHने सोशल मीडियावर या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. कृष्णाने SRHच्या राहुल त्रिपाठीला ( ०) व ट्रेंट बोल्टने निकोलस पूरनला (०) बाद केले. SRHने पॉवर प्लेमध्ये ३ बाद १४ धावा करताना आयपीएलमधील पॉवर प्लेतील खराब कामगिरी नोंदवली. 


१२ वर्षांनंतर पुन्हा राजस्थानकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला ( ९) बाद करून हैदराबादची अवस्था ४ बाद २९ अशी केली. चहलने आणखी एक धक्का देताना हैदराबादचा निम्मा संघ ३७ धावांवर माघारी पाठवला. एडम मार्कराम व रोमारिओ शेफर्ड यांनी सहाव्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या, परंतु चहलने ही जोडी तोडली. शेफर्डला २४ धावांवर चहलने त्रिफळाचीत केले.  चहलने २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह चहलने ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील २५० विकेट्स पूर्ण केल्या. प्रसिद्ध कृष्णाच्या चौथ्या षटकात १४ धावा आल्या, पण त्याने ४ षटकांत १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्यात १ निर्धाव षटक फेकले. वॉशिंग्टन सुंदरने १४ चेंडूंत ४० धावा केल्या, एडन मार्करामनेही नाबाद ५७ धावांची खेळी केली. हैदराबादला ७ बाद १४९ धावा करता आल्या आणि राजस्थानने ६२ धावांनी सामना जिंकला. 
 

Read in English

Web Title: IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Rajasthan Royals have defeated Sunrisers Hyderabad by 61 runs, Kane williamson Controversial wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.