IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: सनरायझर्स हैदराबादने मिळवलेली पहिली विकेट NO Ball मुळे नाकारली गेली असली तरी त्यांनी हळुहळू सामन्यावर पकड घेतली. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जोस बटलर व यशस्वी जैस्वाल SRHच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना मालकीणबाई काव्या मारन ( Kaviya Maran) निराश दिसल्या. पण, ७व्या षटकात तिच्या चेहऱ्यावर स्मित परतले... IPL 2022 Mega Auction मध्ये Mumbai Indians सोबत झगडून ज्या खेळाडूला ७.७५ कोटी मोजून संघात घेतले, त्याने सनरायझर्स हैदराबादला पहिले यश मिळवून दिले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पहिल्याच षटकात यशस्वी ठरताना दिसला. भुवनेश्वर कुमारने स्वींग मिळणाऱ्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला चांगलेच सतावले. पाचव्या चेंडूवर बटलरचा झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या अब्दुल समदने टिपला आणि हैदराबादच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. पण, काही सेकंदातच अम्पायरने हा निर्णय बदलला आणि भुवनेश्वर कुमारचा ( Bhuvneshwar Kumar) चेहरा पडला. भुवीने टाकलेला चेंडू आऊट स्वींग झाला अन् तो मारण्याच्या प्रयत्नात बटलरच्या बॅटची कड त्याला लागली. स्लीपमध्ये समदने सुरेख झेल घेतला अन् एकच जल्लोष झाला. पण, तिसऱ्या अम्पायरने भुवीने नो बॉल टाकल्याचे सांगितले आणि SRHचे खेळाडू निराश झाले.
जीवदान मिळाल्यावर बटलस सुसाट सुटला.. त्याने उम्रान मलिकच्या १४८kmph च्या वेगाने येणाऱ्या चेंडूवर तुफान फटकेबाजी केली. त्याच्या एका षटकात २० धावा चोपल्या. आयपीएलमध्ये २००० धावांचा पल्ला ओलांडणारा बटरल हा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला. त्याने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ५८ धावा जोडल्या. यशस्वी ७व्या षटकाच्या रोमारिओ शेफर्डच्या ( Romario Shepherd ) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने १६ चेंडूंत २० धावा केल्या. ही विकेट मिळताच मालकीण काव्या मारनकडे कॅमेरा वळला अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद त्याने टिपला.
आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूसाठी शेफर्डसाठी ( Romario Shepherd IPL 2022 price) हैदराबादने ७.७५ कोटी मोजले. या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनीही बोली लावली होती. कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये त्याने १८ विकेट्स घेतल्या होत्या.
Web Title: IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card Updates : Romario Shepherd gets his maiden IPL wicket, Yashasvi Jaiswal departs for 20 in 16 balls, Kaviya Maran happy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.