IPL 2022 T20 Match SRH vs RR Live Score card: राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) हे इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, RR चा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याने पुण्याच्या मैदानावर विक्रम रचला.
रॉयल्सने दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वात २००८ ला पहिले आयपीएल जिंकले होते. मात्र, त्यानंतर या संघाने प्रभावी कामगिरी केलेली नाही. सॅमसनने दरवर्षी एक- दोन सामन्यांत दमदार खेळी केली. दुसऱ्या जेतेपदासाठी मात्र त्याला कामगिरीत सातत्य दाखवावेच लागेल. सनरायजर्सकडे अनुभवी फलंदाज केन विलियम्सन आणि ग्लेन फिलिप्स हे सलामीवीर असून मधल्या फळीची भिस्त निकोलस पूरण, प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर राहील.
जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल रॉयल्सच्या डावाची सुरुवात करतील. मधल्या फळीत शिमरोन हेटमायर, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, जिमी नीशॅम आणि रियान पराग हे आहेत. फिरकीची बाजू रविचंद्रन आश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्याकडे असेल. वेगवान माऱ्यासाठी ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा हे आहेत. राजस्थान रॉयल्स जोस बटलर, शिमरोन हेटमायर, नॅथन कोल्टर-नायल आणि ट्रेंट बोल्ट या चार परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार आहेत. संजूचा हा राजस्थानकडूनचा १००वा आयपीएल सामना आहे आणि अजिंक्य रहाणेनंतर ( १०६) RR कडून इतके सामने खेळणारा संजू हा दुसराच खेळाडू ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, रियान पराग, नॅथन कोल्टर-नायल, युझवेंद्र चहल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा
सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उम्रान मलिक