नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात 10 संघ दिसणार आहेत. आयपीएल 2022 बाबत (IPL 2022 ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच जाहीर केले होते की, आणखी दोन संघ या स्पर्धेत सामील होणार आहेत. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे आणि रिपोर्टनुसार, 25 ऑक्टोबरला दोन नवीन संघांसाठी दुबईमध्ये बोली लावली जाणार आहेत. (Deepika Padukone, Ranveer Singh Set To Enter Bidding War For New IPL 2022 Team: Report)
अनेक मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार्स आणि कंपन्यांना आयपीएलमध्ये आपला नवीन संघ उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. आता हे देखील समोर आले आहे की, आयपीएल 2022 मध्ये कोणत्या शहरांचे संघ पाहिले जाऊ शकतात. दरम्यान, आयपीएल 2022 च्या नवीन संघांसाठी अहमदाबाद आणि लखनऊ या शहरांची नावे समोर येत आहेत, असे आयपीएल संघ बोली प्रक्रियेच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.
आयपीएल 2022 साठी बोली येत्या सोमवारी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. यासाठी जगभरातील अनेक व्यावसायिक दिग्गज सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. अदानी ग्रुप (Adani Group) या प्रसिद्ध भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने अहमदाबाद येथून संघासाठी बोली लावल्याची माहिती आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) देखील आयपीएलच्या नवीन संघांसाठी बोली लावू शकतात, असे म्हटले जात आहे. दोन सर्वोच्च बोलीदार प्रतिष्ठित स्पर्धेत दोन नवीन फ्रँचायझीचे मालक असतील.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयला बोलीदारांकडून सुमारे 7000 ते 10,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत. बीसीसीआयने नवीन संघांची मूळ किंमत 2000 कोटी रुपये निश्चित केली आहे. तसेच, बीसीसीआयने 3000 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना नवीन संघांसाठी बोली लावण्याची परवानगी दिली. बीसीसीआयने बोली लावणाऱ्यांची मुदत बुधवार, २० ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.
दोन नवीन संघांसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गज आहेत. या व्यतिरिक्त, हे देखील समोर येत आहे की, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील आयपीएलच्या नवीन संघांसाठी बोली लावू शकतात, कारण बीसीसीआयने परवानगी दिली आहे की, एकापेक्षा जास्त व्यक्ती देखील संघ तयार करू शकतात. दरम्यान, बीसीसीआयने आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन फ्रँचायझींसाठी धर्मशाला, गुवाहाटी, रांची, लखनौ, अहमदाबाद आणि कटक या सहा शहरांची निवड केली होती.
Web Title: IPL 2022 Team: Deepika-Ranveer to buy new IPL team, counting Rs 3,000 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.