Join us  

BCCI take action against Covid offenders, IPL 2022 : चुकीला माफी नाही; Bio Bubble चे नियम मोडाल तर याद राखा; १ सामन्याची बंदी, १ कोटींचा दंड अन्...

BCCI take action against Covid offenders, IPL 2022 : मागच्या आयपीएलचा अनुभव लक्षात घेता BCCIने यंदा कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 6:17 PM

Open in App

BCCI take action against Covid offenders, IPL 2022 : मागच्या आयपीएलचा अनुभव लक्षात घेता BCCIने यंदा कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. आयपीएल २०२१चा बायो बबल फुटल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याची आणि उर्वरित सामने यूएईत हलवण्याची नामुष्की BCCIवर ओढावली होती. त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरूवात होण्याआधी BCCIने काही कठोर नियम तयार केले आहेत. IPL 2022 दरम्यान Bio Bubble नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत BCCIने दिले आहेत.

यामध्ये एका सामन्याची बंदी ते सात दिवसांचे क्वारंटाईन पासून १ कोटीपर्यंतचा दंड यांचा समावेश आहे. हे नियम फक्त खेळाडू व फ्रँचायझी ऑफिशियल्ससाठी नसून त्यांच्या कुटुंबीयांनाही पाळावे लागणार आहेत.  ''कोरोनाचा धोका हा व्यक्ती व संपुर्ण स्पर्धेसाठी घातकी आहे. त्यामुळेच प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी Cricbuzz ला सांगितले.  

काय असेल शिक्षा?

  • पहिल्या चुकीसाठी - ७ दिवसांचे क्वारंटाईन.. या कालावधीत खेळाडू जेवढ्या सामन्यांना मुकेल त्याचा पगार त्याला मिळणार नाही
  • दुसऱ्या चुकीसाठी - ७ दिवासांच्या क्वारंटाईननंतर एका सामन्याची बंदी ( पगाराशिवाय)  
  • तिसऱ्या चुकीसाठी - संपूर्ण पर्वासाठी संघातून बाहेर केले जाईल आणि संघाला त्याची रिप्लेसमेंट करता येणार नाही 

 

कुटुंबियांसाठी नियम

  • पहिली चूक - खेळाडू, टीम अधिकारी किंवा मॅच अधिकारी यांच्यासह कुटुंबियांना ७ दिवसांचे क्वारंटाईन
  • दुसरी चूक - कुटुंबातील सदस्याची संपूर्ण पर्वातून हकालपट्टी आणि संबंधित खेळाडूला ७ दिवसांचे क्वारंटाईन  

 अन्य नियम 

  • कोरोना परिस्थितीमुळे एखादा संघ मैदानावर ११ खेळाडू उतरवण्यास असमर्थ राहिल्यास, त्या सामन्याची नवीन तारीख ठरवली जाईल. पण, जर नव्या तारखेत तो सामना खेळवणे शक्य न झाल्यास अंतिम निर्णय हा तांत्रिक समिती घेईल, हे बीसीसीआयने स्पष्ट केले.
  • एखाद्या संघाने बीसीसीआयला न कळवता बाहेरील व्यक्तिस बायो बबलमध्ये प्रवेश दिल्यास त्याला एक  कोटी दंड भरावा लागेल आणि अशी चूक वारंवार घडल्यास संघाच्या खात्यातील १ किंवा २ गुण कमी केले जाणार आहेत. 
  • BCCI ला न कळवता बायो बबलमध्ये कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना प्रवेश दिल्यास फ्रँचायझीला दंड भरावा लागेल.    
  • कोरोना चाचणी चुकवणाऱ्या खेळाडूला त्याच्या प्रत्येक चूकीसाठी प्रत्येकी ७५ हजार दंड म्हणून भरावे लागतील.  
टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App