मतीन खान, स्पोर्ट्स हेड-लोकमत पत्रसमूह
२००३ च्या विश्वचषकाआधी सचिन खराब फॉर्मशी झुंजत होता. तुझ्या खराब फॉर्मचे तुझ्याकडे काही उत्तर आहे काय? असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला होता. त्यावर सचिन म्हणाला, उत्तर माझ्याकडे नाही, माझी बॅट लवकरच तुम्हाला उत्तर देईल. २००३ च्या विश्वचषकात सचिनने ६७३ धावा ठोकल्या. भारताने अंतिम फेरी गाठली तर सचिन स्पर्धेतील सर्वाोत्कृष्ट खेळाडू बनला.
असाच एक ‘बाजीगर’ डेव्हिड वॉर्नरची चर्चा होते. आयपीएलच्या दोन कोटी रुपये या बेसप्राईजमध्ये त्याला स्थान मिळाले आहे. मागच्या पर्वात सनरायजर्स हैदराबादने वॉर्नरला ज्या पद्धतीने वागणूक दिली ते पाहून ‘वॉर्नर यूग’ संपल्याचे जाणवत होते. सुरुवातीच्या सहा सामन्यात नेतृत्व केल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. भरीसभर म्हणजे एका सामन्यानंतर त्याला मैदानातून बेदखल करण्यात आले. सनरायजर्सच्या ‘डगआऊट’मध्येही वॉर्नरचा चेहरा दिसत नव्हता. वॉर्नरने भावना व्यक्त करीत म्हटले की, ‘मला फार वाईट वाटते. वेदना होत आहेत. खेळाडू देखील एक माणूस असतो आणि त्याला संवेदना असतात.’
पण अखेर साधारण व्यक्ती आणि खेळाडू यांच्यात एक फरक असतो. वॉर्नरने स्वत:च्या वाईट वागणुकीचा वचपा टी-२० विश्वचषकात प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध काढला. २८९ धावा ठोकणाऱ्या या खेळाडूने ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार जिंकला. येथूनच सुरू झाली ती वॉर्नरच्या ‘बाजीगर’ बनण्याची कथा. हाच वॉर्नर पुन्हा एकदा आयपीएल फ्रॅन्चायजींचा आवडता खेळाडू बनलेला दिसतो. लिलावात त्याच्यावर कोट्यवधींची बोलीदेखील लागू शकते. वॉर्नरच्या धडाक्याचा सलाम! त्याने संघर्षमय वाटचालची नमुना सादर केला. स्वत:ची बॅट तळपत ठेवली. यामुळे त्याचे मूल्य वाढले. त्याच्या मनात या ओळी आल्या असाव्यात...