IPL 2022: IPL चा 15वा सीझन अतिशय धमाकेदार पद्धतीने सुरू आहे. यंदाच्या मोसमात गुजरात आणि लखनौ सुरुवातीपासूनच जबरदस्त कामगिरी करत आहेत. विशेषत: गुजरातचा संघ आयपीएल 2022 जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे, यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचणेही जवळपास अशक्य झाले आहे.
CSK ची निराशाजनक कामगिरीCSK साठी IPL 2022 खूप वाईट जात आहे. 4 वेळचा चॅम्पियन संघ आता IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. सीझन सुरू होण्यापूर्वीच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर या संघाला सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली नवा कर्णधार रवींद्र जडेजा याने सीएसकेला 6 पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवून दिला आहे. सीएसके लीग टेबलमध्ये खालून दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईची वाईट अवस्थाIPL 2022 मध्ये CSK पेक्षा वाईट संघ असेल तर तो मुंबई इंडियन्स आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांचे सर्व 6 सामने गमावले आहेत. सध्या मुंबई पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. आपल्या संघाला पाचवेळा ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्माही यंदाच्या मोसमात अपयशी ठरला आहे. मुंबईने आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तरी हा संघ यंदा प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही.
दोन्ही संघ यांच्या मोसमात फेलमुंबई आणि सीएसके बद्दल बोलायचे झाले तर, या संघांना IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानले जाते. आयपीएलच्या 14 हंगामात या दोन संघांनी 9 वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण यंदाच्या मोसमात या दोन्ही संघाची अवस्था खूप वाईट झाली आहे. आयपीएलच्या दोन सर्वात यशस्वी संघांकडे सध्या सर्वात कमकुवत संघ म्हणून पाहिले जाते. रविवारीही सीएसकेला गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबईला गेल्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला होता.