Reliance Jio Stadium - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीचे वेळापत्रक अन् ठिकाण यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आयपीएल मेगा ऑक्शननंतर ( IPL 2022 Mega Auction) दहा फ्रँचायझीचे संघही निश्चित झाले आहे. त्यामुळे आता स्पर्धेच्या वेळापत्रकाची उत्सुकता आहे. आयपीएल २०२२ चे संपूर्ण पर्व महाराष्ट्रात खेळवण्याच्या हालचाली बीसीसीआयने आधीपासूनच सुरू केल्या आहेत. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएलचे साखळी फेरीचे सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियम स्टँड बाय ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यात आता आणखी एका स्टेडियमचं नाव समोर येत आहे. IPL गव्हर्निंग काऊंसिलने Reliance Jio stadium चा समावेश लीगसाठीच्या संभाव्य स्थळात केला आहे.
या स्टेडियमवर सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत आणि मुंबई इंडियन्सचे सराव सत्र इथेच होते. त्यामुळे बीसीसीआयने शॉर्ट लिस्ट केलेल्या मुंबई, पुणे व अहमदाबाद येथील स्टेडियम्सपैकी सर्वाधिक स्टेडियम्स हे मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंडच आहे.
IPL 2022 Venues
- साखळी फेरीतील ७० सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येतील आणि प्ले ऑफच्या लढती अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.
- मुंबईतील वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियमसह नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियम आयपीएल २०२२ सामन्यांसाठी तयार ठेवण्यात सांगितली आहेत.
- त्यात आता नवी मुंबईतील रिलायन्स जिओ स्टेडियमचाही समावेश करण्यात आला आहे. आता ब्रॉडकास्ट टीमने मान्यता दिल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल
- २६ किंवा २७ मार्चपासून IPL 2022ला सुरुवात होणार असून मे अखेरपर्यंत १५ वे हंगाम संपेल. येत्या आठवड्यात बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
- बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसचा धोका अजूनही पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे स्पर्धेदरम्यान विमानाचा प्रवास टाळण्यासाठी संपूर्ण लीग महाराष्ट्रात खेळवण्याचा प्रयत्न आहे
रिलायन्स जिओ स्टेडियम नेमकं आहे कुठे?
Where is the stadium? - रिलायन्स जिओ स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय अंतिम झालेला नाही. हे स्टेडियमम घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे उभारण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचे सराव सत्र इथे भरवण्यात येतात.