Rahul Tripathi Aiden Markram, IPL 2022 SRH vs KKR Live Updates: कोलकाता विरूद्ध सनराझयर्स हैदराबाद संघाने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणाचे अर्धशतक आणि आंद्रे रसलची तुफानी खेळीच्या याच्या जोरावर १७५ धावा केल्या. आव्हानाचा सामना करताना SRH ने राहुल त्रिपाठी (७१) आणि एडन मार्करम (नाबाद ६८) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर KKR वर मोठा विजय मिळवला. सुरूवातीच्या सामन्यात हैदराबादचा संघ पराभूत होत असल्याने संघमालक काव्या मारन हिचे दु:खी असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर गेल्या दोन सामन्यात ती स्टेडियममध्ये फारशी दिसली नव्हती. मात्र आज एडन मार्करमने शानदार हवाई फटका खेळत षटकार लगावला आणि हैदराबादने विजयाची हॅटट्रिक केली. त्यानंतर काव्या मारनच्या चेहऱ्यावर हसू उमलल्याचे दिसून आले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या डावाची सुरूवात खराब झाली. आरोन फिंच (७), व्यंकटेश अय्यर (६), सुनील नरिन (६) आणि श्रेयस अय्यर (२८) हे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर नितीश राणाने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा तर आंद्रे रसलने ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत नाबाद ४९ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने सलामीवीर अभिषेक शर्मा (३) आणि केन विल्यमसन (१७) स्वस्तात गमावले. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम जोडीने ९४ धावांची भागीदारी दिली. राहुल ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ७१ धावा काढून माघारी गेला. पण मार्करमने संघाला विजय मिळवून दिला. त्याने ६ चौकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत नाबाद ६८ धावा कुटल्या.
पाहा सामन्याचे हायलाईट्स-
कोलकाता नाइट रायडर्स:
आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (किपर), पॅट कमिन्स, सुनील नरिन, उमेश यादव, अमन खान, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद:
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (किपर), एडन मार्करम, शशांक सिंग, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन
Web Title: IPL 2022 Video Kavya Maran smile after SRH batter Aiden Markram hits superb winning shot against KKR KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.