R Ashwin, IPL 2022 RR vs DC Live: राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर याचे फटकेबाजी साऱ्यांनीच पाहिली आहे. पण आजच्या सामन्यात चाहत्यांना रविचंद्रन अश्विनची फटकेबाजी पाहण्याची संधी मिळाली. यशस्वी जैस्वाल (१९) आणि जोस बटलर (७) दोघेही स्वस्तात बाद झाले. त्यामुळे रविचंद्रन अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात आले आणि त्याने कर्णधाराच निर्णय सार्थ ठरवला. रवीचंद्रन अश्विनने ३८ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याचं हे IPL कारकिर्दीतील पहिलंच अर्धशतक ठरलं. त्याने आपल्या डावात ४ चौकार आणि २ षटकार मारले. त्यातील एका चौकाराची विशेष चर्चा रंगल्याचे दिसून आले.
१४व्या षटकात अश्विन अतिशय चांगल्या लयीत खेळत होता. चेतन साकरिया त्याला गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने अश्विनला बाऊन्सर चेंडू टाकला. अश्विनने देखील अतिशय हुशारीने चेंडू खेळला. चेंडू डोक्याजवळ आल्यानंतर त्याने चेंडूला हळूच दिशा दिली आणि अप्पर कट खेळून चेंडू किपरच्या डोक्यावरून चौकार मारला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, राजस्थानच्या फलंदाजांच्या झुंजार खेळीच्या जोरावर त्यांनी २० षटकांत १५०पार मजल मारली. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने अर्धशतक ठोकलं. देवदत्त पडिक्कलचं अर्धशतक थोडक्यासाठी हुकलं. त्याने ३० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या साथीने ४८ धावा केल्या. त्यांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने ही मजल मारली.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, रॅसी व्हॅन डर डुसेन, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया, कुलदीप यादव, अॅनरिक नॉर्खिया