Join us  

IPL 2022: विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा हे पैशाचे मोल नाही फेडू शकले; युवा खेळाडूंनी मिळालेल्या किंमतीपेक्षा अधिक दिले!

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे तीन मोठे स्टार अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:51 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे तीन मोठे स्टार अपयशी ठरले. ५ जेतेपदं नावावर असलेला मुंबई इंडियन्स आणि ४ जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स यांना गुणतालिकेत अखेरच्या दोन क्रमांकावर समाधान मानावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने MI च्या कृपेने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला, परंतु क्वालिफायर २ मध्ये त्यांना गाशा गुंडाळावा लागला. विराट, रोहित व धोनी यांच्या कामगिरीचा फटका त्यांच्या संघाला बसलेला पाहायला मिळाला. आयपीएल २०२२ मध्ये या खेळाडूंना मिळालेल्या रकमेचे मोल फेडता आले नाही. त्या उलट युवा खेळाडूंनी मिळालेल्या किमतीपेक्षा अधिक दिले.  

आयपीएल २०२२ मधील Most valuable players, त्यांची मुळ किंमत आणि प्रती रुपयाला मिळालेले गुण 

क्रमांकखेळाडूसंघमुळ किंमतगुण
जितेश शर्मापंजाब किंग्स२० लाख    २४१.८ 
मोहसिन खानलखनौ सुपर जायंट्स२१ लाख    २३४.२
रजत पाटीदाररॉयल चॅलेंजर्स बंगळुरू२२ लाख२०८.४
मुकेश चौधरीचेन्नई सुपर किंग्स२३ लाख१९८.८
आयुष बदोनीलखनौ सुपर जायंट्स२४ लाख१५४.३ 
जे सुचिथ    सनरायझर्स हैदराबाद२५ लाख१०६.८
रमणदीप सिंगमुंबई इंडियन्स२६ लाख१०४.८ 
कुलदीप सेनराजस्थान रॉयल्स२७ लाख१०३.५ 
बी साई सुदर्शनगुजरात टायटन्स२८ लाख७३.३ 
१०कुमार कार्तिकेयमुंबई इंडियन्स २९ लाख६७.५ 
१५७विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १५ कोटी२.६
१६१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स१२ कोटी२.५
१७८रोहित शर्मामुंबई इंडियन्स १६ कोटी१.० 

  या डाटा नुसार रोहित शर्माला १६ कोटी देऊन मुंबई इंडियन्सने प्रती रुपयामागे १ गुण कमावला. धोनी व कोहली यांनी अनुक्रमे २.५ व २.६ गुण कमावले.   

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App