Join us  

Lucknow Super Giants : लखनौ फ्रँचायझीच्या नामकरणाची राजस्थान रॉयल्सनं उडवली खिल्ली; नव्या संघानं करून दिली 'फिक्सिंग' प्रकरणाची आठवण

Lucknow Super Giants is the name of the Lucknow franchise : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 9:15 AM

Open in App

Lucknow Super Giants is the name of the Lucknow franchise : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या टीमचं नाव लखनौ  सुपर जायंट्स असे असणार आहे.  RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. 

१२ व १३ फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. त्यात ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंची नावं आहेत. यापैकी २१७ जणांनाच लॉटरी लागणार आहे. यंदाच्या पर्वात १० संघ खेळणार असल्यानं एकूण सामन्यांची संख्या ७४ होणार आहे. अद्याप आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही. भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.  दरम्यान, लखनौ फ्रँचायझीनं ठेवलेलं नाव पासून  चाहत्यांना रायझिंग पुणे सुपरजायंट ( Rising Pune Supergiant) या टीमची आठवण झाली. २०१६  व २०१७ या पर्वात हा संघ आयपीएल खेळला होता आणि त्याचे मालकी  हक्कही डॉ. संजिव गोएंका यांच्या RPSG Group कडेच होते. या नावावरून राजस्थान रॉयल्सनं गमतीदार मीम्स पोस्ट करून लखनौची फिरकी घेतली. त्यांनी पुणे व लखनौ यांच्या नावात साम्य असल्याचे दर्शवणारे मीम्स पोस्ट केले.   त्यावर लखनौनंही सडेतोड उत्तर देताना राजस्थान रॉयल्सला स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची आठवण करून दिली. २०१६ व २०१७ या पर्वात राजस्थान सह चेन्नई सुपर किंग्स यांच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बंदी घातली गेली होती.   मुंबई इंडियन्स ते कोलकाता नाइट रायडर्स सर्वांनी केलं स्वागत      

टॅग्स :आयपीएल २०२१लखनऊराजस्थान रॉयल्स
Open in App