Yuzvendra Chahal, IPL 2022 : युझवेंद्र चहल बनला Rajasthan Royals चा नवा कर्णधार, संजू सॅमसननेही दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं कारण

IPL 2022, Yuzvendra Chahal new captain of RR : राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) कालच इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:51 PM2022-03-16T14:51:23+5:302022-03-16T15:03:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Yuzvendra Chahal Hacks Rajasthan Royals’ Twitter Account; Announces Himself As The New RR Captain | Yuzvendra Chahal, IPL 2022 : युझवेंद्र चहल बनला Rajasthan Royals चा नवा कर्णधार, संजू सॅमसननेही दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं कारण

Yuzvendra Chahal, IPL 2022 : युझवेंद्र चहल बनला Rajasthan Royals चा नवा कर्णधार, संजू सॅमसननेही दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Yuzvendra Chahal new captain of RR : राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) कालच इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले. त्यांनी हटके अंदाजात ही जर्सी लाँच केली आणि त्या व्हिडीओत संजू सॅमसन व युझवेंद्र चहलही अभिनय करताना दिसले. त्यात बुधवारी राजस्थान रॉयल्सने कर्णधारपदी युझवेंद्र चहरच्या नावाची घोषणा केली आणि एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कर्णधार संजू सॅमसन यानेही त्याचे अभिनंदन केले आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली. पण, हे सोशल मीडियावरील अकाऊंट चहलने हॅक केले आणि स्वतःला कर्णधार म्हणून जाहीर केले. 

आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चहलला रिटेन केले नाही. २०१४ पासून तो या संघाचा सदस्य होता. मेगा ऑक्शनमध्ये RR ने ६.५ कोटींत चहलला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. १६ मार्चला चहलने RR Twitter account चे पासवर्ड माझ्याकडे असल्याचे जाहीर केले आणि धडाधड ट्विट करत सुटला.  



युझवेंद्रने RRच्या अकाऊंटवरून जोस बटलरचा उल्लेख अंकल म्हणून केला

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर,  देवदत्त पड्डीकल, ( ७.७५ कोटी),  शिमरोन हेटमायर ( ८.५० कोटी), रविचंद्रन अश्विन ( ५ कोटी),  ट्रेन्ट बोल्ट ( ८ कोटी), प्रसिद्ध कृष्णा ( १० कोटी), युझवेंद्र चहल ( ६.५० कोटी), रियान पराग ( ३.८० कोटी), केसी करीयप्पा ( ३० लाख), नवदीप सैनी ( २.६० कोटी), ओबेड मॅकॉय ( ७५ लाख), अनुमय सिंग ( २० लाख), नॅथन कोल्टर नायल ( १.५ कोटी), जिमी निशॅम ( १.५ कोटी), डॅरेल मिचेल ( ७५ लाख), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १ कोटी), करुण नायर ( १.४० कोटी), ध्रुव जुरेल ( २० लाख), तेजस बरोका ( २० लाख), कुलदीप यादव ( २० लाख), शुभम गर्हवाल ( २० लाख), अनुनय सिंग ( २० लाख). 

Web Title: IPL 2022: Yuzvendra Chahal Hacks Rajasthan Royals’ Twitter Account; Announces Himself As The New RR Captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.