IPL 2022, Yuzvendra Chahal new captain of RR : राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) कालच इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले. त्यांनी हटके अंदाजात ही जर्सी लाँच केली आणि त्या व्हिडीओत संजू सॅमसन व युझवेंद्र चहलही अभिनय करताना दिसले. त्यात बुधवारी राजस्थान रॉयल्सने कर्णधारपदी युझवेंद्र चहरच्या नावाची घोषणा केली आणि एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कर्णधार संजू सॅमसन यानेही त्याचे अभिनंदन केले आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली. पण, हे सोशल मीडियावरील अकाऊंट चहलने हॅक केले आणि स्वतःला कर्णधार म्हणून जाहीर केले.
आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चहलला रिटेन केले नाही. २०१४ पासून तो या संघाचा सदस्य होता. मेगा ऑक्शनमध्ये RR ने ६.५ कोटींत चहलला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. १६ मार्चला चहलने RR Twitter account चे पासवर्ड माझ्याकडे असल्याचे जाहीर केले आणि धडाधड ट्विट करत सुटला.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पड्डीकल, ( ७.७५ कोटी), शिमरोन हेटमायर ( ८.५० कोटी), रविचंद्रन अश्विन ( ५ कोटी), ट्रेन्ट बोल्ट ( ८ कोटी), प्रसिद्ध कृष्णा ( १० कोटी), युझवेंद्र चहल ( ६.५० कोटी), रियान पराग ( ३.८० कोटी), केसी करीयप्पा ( ३० लाख), नवदीप सैनी ( २.६० कोटी), ओबेड मॅकॉय ( ७५ लाख), अनुमय सिंग ( २० लाख), नॅथन कोल्टर नायल ( १.५ कोटी), जिमी निशॅम ( १.५ कोटी), डॅरेल मिचेल ( ७५ लाख), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १ कोटी), करुण नायर ( १.४० कोटी), ध्रुव जुरेल ( २० लाख), तेजस बरोका ( २० लाख), कुलदीप यादव ( २० लाख), शुभम गर्हवाल ( २० लाख), अनुनय सिंग ( २० लाख).