Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 : मार्ग आव्हानात्मक आहे, पण...!; MI ने बाकावर बसवून ठेवल्यानंतर सचिन तेंडुलकरचा अर्जुनला सल्ला

Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 :  महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (  Arjun Tendulkar) याचे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण काही झाले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:17 PM2022-05-24T23:17:58+5:302022-05-24T23:18:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022:‘Path is going to be challenging, continue to work hard’, Sachin Tendulkar gives advice to son Arjun Tendulkar after Mumbai Indians snub | Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 : मार्ग आव्हानात्मक आहे, पण...!; MI ने बाकावर बसवून ठेवल्यानंतर सचिन तेंडुलकरचा अर्जुनला सल्ला

Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 : मार्ग आव्हानात्मक आहे, पण...!; MI ने बाकावर बसवून ठेवल्यानंतर सचिन तेंडुलकरचा अर्जुनला सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sachin Tendulkar advice to Arjun IPL 2022 :  महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (  Arjun Tendulkar) याचे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण काही झाले नाही. आयपीएल २०२१मध्ये बाकावर बसवून ठेवल्यानंतर यंदातरी मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)  अर्जुनला पदार्पणाची संधी देतील असे अखेरच्या  साखळी सामन्यापर्यंत वाटत होते. पण, अर्जुनच्या मागून आलेल्या हृतिक शोकिन, कुमार कार्तिकेय आदी युवा खेळाडूंनी आयपीएल २०२२मध्ये MI कडून पदार्पण केले. त्यात आता अर्जुनला मुंबईच्या रणजी संघातूनही वगळले. अशात सचिनने आपल्या मुलाला मोलाचा सल्ला दिला आहे. 
 

''हा मार्ग आव्हानात्मक आहे, हे मी नेहमीच अर्जुनला सांगतो.. तो आणखी खडतर असेल.. तुला हा खेळ आवडतो म्हणून तू तो खेळायला सुरुवात केली. असेच करत राहा, मेहनत करत राहा आणि कष्टाचं फळ मिळेल,''असा सल्ला तेंडुलकरने ‘SachInsight’या कार्यक्रमात बोलताना अर्जुनला दिला. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आहे, परंतु संघ निवडीत आपला कोणताच हस्तक्षेप नसल्याचे त्याने स्पष्ट केले. अर्जुनला ३० लाखांत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये करारबद्ध केले. पण, आयपीएल २०२१प्रमाणेच त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही.  

तुला अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना आवडले असते का, या प्रश्नावर तेंडुलकर म्हणाला,''हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करतो किंवा मला काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. हे पर्व संपले आहे.''

''तुम्ही संघ निवडीबाबत बोलत असाल, तर मी कधीच त्यात ढवळाढवळ करत नाही. ते काम संघ व्यवस्थापनाचे आहे आणि ते तसेच नेहमी सुरू असते,''असेही तेंडुलकरने स्पष्ट केले.  

Web Title: IPL 2022:‘Path is going to be challenging, continue to work hard’, Sachin Tendulkar gives advice to son Arjun Tendulkar after Mumbai Indians snub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.