IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

प्रीती झिंटाची मालकी हक्क असलेल्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:30 PM2022-08-22T15:30:38+5:302022-08-22T15:31:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 : After coach Anil Kumble, Punjab Kings set to REMOVE Mayank Agarwal as captain, Jonny Bairstow likely to lead | IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी आतापासून फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. रवींद्र जडेजा पुढील पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार की नाही, हे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या ट्रेडिंग विंडोनंतर स्पष्ट होईल. त्यात प्रीती झिंटाची मालकी हक्क असलेल्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पंजाब किंग्सने आणखी एक सदस्याला जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. पंजाब किंग्सने मागील पर्वात मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) याला कर्णधाराची जबाबदारी दिली होती, परंतु आता त्याची उचलबांगडी होणार आहे. पुढील पर्वात इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजाकडे ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

PBSK ने आधीच मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबतचा तीन वर्षांचा प्रवास संपुष्टात आणण्याची तयारी दर्शवली आहे. InsideSportच्या वृत्तानुसार ट्रेव्हर बायलिस व इयॉन मॉर्गन यापैकी एक पंजाब किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात.  त्यात कर्णधार मयांक अग्रवालकडूनही कर्णधारपद काढून घेतले जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

''मयांककडे पुढच्या पर्वात कर्णधारपद देण्याचा आमचा विचार नाही. त्याने त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. अनिल कुंबळेबाबत विचारल्यास आम्ही काही पर्यायांचा विचार करतोय.  आमच्याकडे बराच वेळ आहे आणि योग्य वेळी निर्णय घेऊ,''असे पंजाब किंग्सच्या अधिकाऱ्याने सांगितले.  

मयांकने मागील पर्वात १३ सामन्यांत १६.३३ च्या सरासरीने १९६ धावाच केल्या. आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने भारतीय संघातीलही स्थान गमावले.  मयांकच्या जागी जॉनी बेअरस्टो याचे नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.   
 

Web Title: IPL 2023 : After coach Anil Kumble, Punjab Kings set to REMOVE Mayank Agarwal as captain, Jonny Bairstow likely to lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.